मिरज येथील बेथेसदा स्कूल जवळ एका स्क्रॅप गोडाऊन लागली भीषण आग. दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क प्रतिनिधी…
Category: ताज़ा खबरें
सौर उर्जेवर चालणाऱ्या पाण्याच्या टाकीचे ग्रामपंचायत सावळी येथे उद्घाटन.
———————————————
वीज बिलाला पर्यायी मार्ग पायलट प्रोजेक्ट म्हणून ग्रामपंचायतने उभारलेल्या सौरऊर्जा पाणी टाकीचे ग्रामस्थांना कौतुक.सरपंच सदस्यासह बांधकाम ठेकेदार यांचे ग्रामस्थांनी मांडले आभार.
———————————————
मनोज कांबळे — मिरज प्रतिनिधी
दिनांक 7 जानेवारी 2025
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क,विशेष
———————————————
एका बाजूला अनेक ग्रामपंचायत नळ पाणीपुरवठा योजनेचे वीज बिले थकल्याने कनेक्शन तोडण्याचे प्रकार वाढत चालले असताना याला पर्याय म्हणून सावळी ग्रामपंचायत ने प्रभाग क्रमांक पाच मध्ये सौर ऊर्जावर चालणारी पिण्याचे पाणी टाकीचे बांधकाम पूर्ण केले असून नुकतेच
त्याचे उद्घाटन झाले.यामुळे या अनोख्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या पाणी टाकीबदल परिसरातून कौतुक करण्यात येत आहे.
ग्रामपंचायत सावळी ग्रामपंचायतने सौर उर्जेवरती चालणारी पिण्याचे पाण्याची टाकी प्रभाग क्रमांक पाच मध्ये ग्रामपंचायत च्या स्व-निधीतून सुमारे पाच हजार लिटर क्षमता असलेली टाकी सौर पंप वन एचपी आणि सौर पॅनल वन केजी व्हॅट इतक्या क्षमतेची बसवल्याने परिसरातून नव्याने उभारलेल्या या सौर ऊर्जा युक्त पाण्याच्या टाकीचे पायलट प्रोजेक्ट म्हणून प्राथमिक स्तरावर ग्रामस्थ व परिसरातील इतरांच्या कडून कौतुक करण्यात येत आहे.तसेच प्रभाग क्र ५ चे सदस्य दिपक कारंडे यांनी वेळोवेळी या कामाचा पाठपुरावा करून सदरील प्रकल्प मंजूर करणेस सहकार्य केले.
या पाण्याच्या टाकीचे बांधकाम अतिशय उत्कृष्ट दर्जाचे टिकाऊ झाले असून जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून यासाठी महत्त्वाचे मार्गदर्शन लाभले आहे तसेच सदरचे बांधकाम गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर
श्री संग्राम माने यांनी पूर्ण केले आहे.
सावळी हे गाव औद्योगिक वसाहत कुपवाड परिसराच्या नजीक असून सावळी ग्रा.प. कार्यक्षेत्रात विविध कोल्ड स्टोरेज,फाउंड्री, कारखाने तसेच औषध निर्माण करणारे कारखाने आहेत.
या सौरऊर्जेवरती चालणाऱ्या पाण्याच्या टाकीची संकल्पना पूर्णत्वाकडे नेण्यासाठी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सन्मती गणे उपसरपंच निर्मला कुपवाडे, कुबेर गणे, दीपक कारंडे, बजरंग माळी, अबू समलेवाले, रोहित तांबडे, पूजा बंडगर, छाया मोरे, उषा शिंदे, फिरोजा मुलाणी, प्रदीप कोरे, प्रदीप बंडगर, कल्पना शिंदे, धर्मप्रिया कांबळे, राजू चौगुले, किरण डोंगरे, अजय कांबळे पाणी टाकी उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.
तसेच ग्रामपंचायत अधिकारी
श्री बाबासाहेब खाडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
मिरज-पंढरपूर रोड गुंठेवारी भागातील अतिक्रमणे हटविण्या संदर्भामध्ये युवासेना मिरज शहर यांच्यातर्फे उपायुक्त यांना निवेदन.
मिरज-पंढरपूर रोड गुंठेवारी भागातील अतिक्रमणे हटविण्या संदर्भामध्ये युवासेना मिरज शहर यांच्यातर्फे उपायुक्त यांना निवेदन. दैनिक वृत्तवेग…
भारताने सातव्यांदा आयसीसी स्पर्धा जिंकली
भारताने सातव्यांदा आयसीसी स्पर्धा जिंकली दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:- आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला हरवून…
मिरज-मल्लेवाडी रोड वर दोन दुचाकीचा अपघात.
मिरज-मल्लेवाडी रोड वर दोन दुचाकीचा अपघात. दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क- मिरज मल्लेवाडी रोडवर दोन दुचाकीचा समोरासमोर…
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया सांगली जिल्ह्यातर्फे IPS सुनील फुलारी सरांचा सत्कार करण्यात आला.
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र(IPS)मा.श्री. सुनील फुलारी सर यांना केंद्र सरकारच्या वतीने…
पत्रकार प्रसाद पिसाळच्या हल्लेखोरांवर ‘एमपीएडीए’ ची कारवाई ; पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा दणका
प्रसाद पिसाळच्या हल्लेखोरांवर ‘एमपीएडीए’ ची कारवाई ; पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा दणका विट्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी…
बालिकेचा अत्याचाराने खून करणाऱ्या नराधमाला जलदगती खटल्याने फाशी द्या
पुरोगामी संघर्ष परिषदेची मिरज तहसील समोर निदर्शने बालिकेचा अत्याचाराने खून करणाऱ्या नराधमाला जलदगती खटल्याने फाशी द्या…
भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल सांगलीचे मानद संचालक, डॉ.एच.एम.कदम (आण्णा) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:- सांगली : भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल सांगली येथील मानद संचालक डॉ. हणमंतराव…
ब्रेकिंग:कुपवाड शहर हादरले एकाच दिवशी दोन युवकांची आत्महत्या स्वामी गल्ली येथे युवकाची आत्महत्या.
कुपवाड मध्ये आज दोन युवकांची आत्महत्या. (आत्महतेचे कारण अस्पष्ट) अथर्व हिरेमठ स्वामी गल्ली कुपवाड वय वर्ष…
ब्रेकिंग:-कुपवाड बाळकृष्ण नगर मध्ये राहत्या घरी गळफास घेऊन युवकाने केली आत्महत्या.
ब्रेकिंग:कुपवाड बाळकृष्ण नगर मध्ये राहत्या घरी गळफास घेऊन युवकाने केली आत्महत्या. (कारण अजुन अस्पष्ट) दैनिक वृत्तवेग…