

भारताने सातव्यांदा आयसीसी स्पर्धा जिंकली
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:-

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला हरवून भारतीय संघाने तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव केला. यासह, भारताने सातव्यांदा आयसीसी स्पर्धा जिंकली.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाने एकही सामना न गमावता विजेतेपदाला गवसणी घातली. 2013 नंतर भारताने पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकली आहे.
