न्यू प्रायमरी स्कूल कुपवाडमध्ये महिलादिन विविध उपक्रमांनी संपन्न.

Spread the love

न्यू प्रायमरी स्कूल कुपवाडमध्ये महिलादिन विविध उपक्रमांनी संपन्न.

दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क प्रतिनिधी मनोज कांबळे

नव महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित,न्यू प्रायमरी स्कूल कुपवाड मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. लाल बहाद्दूर बालक मंदिर व न्यू प्रायमरी स्कूलच्या वतीने महिलापालक व विद्यार्थी अशा भव्य रेकॉर्डनृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. त्याचबरोबर डॉ. तबस्सुम शिकलगार माँम फौंडेशन यांचे स्त्रियांचे आरोग्य व मुलांचे संगोपन याबद्दल विशेष व्याख्यानही आयोजित करण्यात आले.

यानिमित्ताने शाळेतील सर्व महिला शिक्षकांचा व परिसरातील सर्व आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांचा,शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल विशेष सन्मान करून शाळेतर्फे एक भेटवस्तूही देण्यात आली. शास्वत ब्लड बँक सांगली यांचेतर्फे एक सामाजिक जाणिव म्हणून रक्तदान शिबिरही घेण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. कुंदन जमदाडे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष मा. अण्णासाहेब उपाध्ये सर ,माजी पालक रत्नप्रभा पाराजे मॅडम, दीपाली गायकवाड मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.स्पर्धेचे परीक्षक म्हणून मोहिनी खोत व प्रणाली पाठक यांनी काम पाहिले.आजच्या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक , शाळेचे पर्यवेक्षक, सर्व शिक्षक, विद्यार्थी- विद्यार्थिनी व महिला पालक उपस्थित राहिले. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक कुंदन जमदाडे सर व आभार सौ .स्वाती बने मॅडम यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *