
नव महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित सौ.आशालता आण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कुल व उच्च माध्यमिक विद्यालय,कुपवाड.मध्ये लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्सहात साजरी.
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:- जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे
नव महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित सौ.आशालता आण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कुल व उच्च माध्यमिक विद्यालय,कुपवाड.मध्ये गुरुवार दिनांक 26/ 6 /2025 रोजी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुणे मा.प्रा.बापूसो जाधव सर यांच्या शुभहस्ते आणि मा.मुख्याध्यापक श्री.चिरमे सर,पर्यवेक्षक श्री.चौगुले सर,जेष्ठ शिक्षक श्री.माळी सर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.रिया पाटील मॅडम यांनी केले.

प्रशालेच्या विद्यार्थिनींनी राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य या विषयावर मनोगते व्यक्त केली. शाळेचे मुख्याध्यापक श्री.चिरमे सर यांनी, राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याची माहिती दिली.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य प्रा.बापू जाधव सर यांनी शाहू महाराजांच्या शिक्षणाचा प्रसार, सामाजिक सलोखा, जातीव्यवस्था, इ.कार्याची माहिती विध्यार्थिनींना आपल्या मनोगतातून सांगितली. सदर कार्यक्रम इयत्ता ५वी.ते १२वी.मधील सर्व विद्यार्थिनी व शिक्षक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
