
परिवर्तन फाउंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा “राजर्षी शाहू प्रेरणा राष्ट्रीय पुरस्कार 2025” मा.सौ. स्वाती यशवंत नाईक यांना प्रदान करण्यात आला.
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:-
ग्रामपंचायत वडणगेच्या उपसरपंच व विद्यमान सदस्य, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या सदस्य “मा.सौ. स्वाती यशवंत नाईक यांना परिवर्तन फाउंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा “राजर्षी शाहू प्रेरणा राष्ट्रीय पुरस्कार 2025 “मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार (भा.प्र.से.), मा. संतोष आठवले संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष, स्वराज्य क्रांती पॅंथर आर्मी, मा. अमोल कुरणे, संस्थापक अध्यक्ष परिवर्तन फाउंडेशन यांचे शुभहस्ते प्रदान करणेत आला.

यावेळी मा. उपसरपंच, ग्रामपंचायत वडणगे व महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती वडणगे चे सदस्य श्री. सयाजीराव घोरपडे व मा. श्री. यशवंत नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते.

