नव महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित ,न्यू प्रायमरी स्कूल कुपवाडयांचेकडून राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

Spread the love

नव महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित ,न्यू प्रायमरी स्कूल कुपवाडयांचेकडून राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:- जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे.

नव महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित ,न्यू प्रायमरी स्कूल कुपवाड येथे आज दिनांक 26/ 6 /2025 रोजी लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

शाहू महाराजांनी आपल्या राज्यात शिक्षणाचा प्रसार केला. सामाजिक सलोखा शाहू महाराजांच्या राज्यात होता. छत्रपतींची परंपरा जातीव्यवस्था मोडणारी व समता प्रस्थापित करणारी परंपरा आहे.

प्रतिमापूजन मा.मुख्याध्यापक श्री. कुंदन जमदाडे सर यांनी केले. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. अनिल शिंदे सर यांनी केले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून राजश्री शाहू महाराज यांच्या कार्याची व विचारांची माहिती दिली. शाळेचे मुख्याध्यापक श्री. कुंदन जमदाडे सर ,पर्यवेक्षक श्री. अनिल शिंदे सर व सौ. हेमलता धोतरे मॅडम यांनीही राजश्री शाहू महाराज यांच्या कार्याची माहिती सांगितली.

या कार्यक्रमासाठी शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री . आण्णासाहेब उपाध्ये सर,उपाध्यक्ष श्री. सूरज उपाध्ये सर व सर्व संचालक यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ. वंदना हाके मॅडम यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *