मिरज बस स्टॅन्ड जवळ अपघात- अशोका ट्रॅव्हल्स च्या मागील चाकात एका इसमाच्या पायाचा चुराडा. दैनिक वृत्तवेग…
Category: ताज़ा खबरें
सौर उर्जेवर चालणाऱ्या पाण्याच्या टाकीचे ग्रामपंचायत सावळी येथे उद्घाटन.
———————————————
वीज बिलाला पर्यायी मार्ग पायलट प्रोजेक्ट म्हणून ग्रामपंचायतने उभारलेल्या सौरऊर्जा पाणी टाकीचे ग्रामस्थांना कौतुक.सरपंच सदस्यासह बांधकाम ठेकेदार यांचे ग्रामस्थांनी मांडले आभार.
———————————————
मनोज कांबळे — मिरज प्रतिनिधी
दिनांक 7 जानेवारी 2025
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क,विशेष
———————————————
एका बाजूला अनेक ग्रामपंचायत नळ पाणीपुरवठा योजनेचे वीज बिले थकल्याने कनेक्शन तोडण्याचे प्रकार वाढत चालले असताना याला पर्याय म्हणून सावळी ग्रामपंचायत ने प्रभाग क्रमांक पाच मध्ये सौर ऊर्जावर चालणारी पिण्याचे पाणी टाकीचे बांधकाम पूर्ण केले असून नुकतेच
त्याचे उद्घाटन झाले.यामुळे या अनोख्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या पाणी टाकीबदल परिसरातून कौतुक करण्यात येत आहे.
ग्रामपंचायत सावळी ग्रामपंचायतने सौर उर्जेवरती चालणारी पिण्याचे पाण्याची टाकी प्रभाग क्रमांक पाच मध्ये ग्रामपंचायत च्या स्व-निधीतून सुमारे पाच हजार लिटर क्षमता असलेली टाकी सौर पंप वन एचपी आणि सौर पॅनल वन केजी व्हॅट इतक्या क्षमतेची बसवल्याने परिसरातून नव्याने उभारलेल्या या सौर ऊर्जा युक्त पाण्याच्या टाकीचे पायलट प्रोजेक्ट म्हणून प्राथमिक स्तरावर ग्रामस्थ व परिसरातील इतरांच्या कडून कौतुक करण्यात येत आहे.तसेच प्रभाग क्र ५ चे सदस्य दिपक कारंडे यांनी वेळोवेळी या कामाचा पाठपुरावा करून सदरील प्रकल्प मंजूर करणेस सहकार्य केले.
या पाण्याच्या टाकीचे बांधकाम अतिशय उत्कृष्ट दर्जाचे टिकाऊ झाले असून जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून यासाठी महत्त्वाचे मार्गदर्शन लाभले आहे तसेच सदरचे बांधकाम गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर
श्री संग्राम माने यांनी पूर्ण केले आहे.
सावळी हे गाव औद्योगिक वसाहत कुपवाड परिसराच्या नजीक असून सावळी ग्रा.प. कार्यक्षेत्रात विविध कोल्ड स्टोरेज,फाउंड्री, कारखाने तसेच औषध निर्माण करणारे कारखाने आहेत.
या सौरऊर्जेवरती चालणाऱ्या पाण्याच्या टाकीची संकल्पना पूर्णत्वाकडे नेण्यासाठी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सन्मती गणे उपसरपंच निर्मला कुपवाडे, कुबेर गणे, दीपक कारंडे, बजरंग माळी, अबू समलेवाले, रोहित तांबडे, पूजा बंडगर, छाया मोरे, उषा शिंदे, फिरोजा मुलाणी, प्रदीप कोरे, प्रदीप बंडगर, कल्पना शिंदे, धर्मप्रिया कांबळे, राजू चौगुले, किरण डोंगरे, अजय कांबळे पाणी टाकी उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.
तसेच ग्रामपंचायत अधिकारी
श्री बाबासाहेब खाडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
भविष्यात मी कॉंग्रेस सोबत नाहीतर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईन :- अपक्ष खासदार विशाल पाटील.
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:- भविष्यात मी कॉंग्रेस सोबत नाहीतर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईन : जयकुमार…
मिरजेत महात्मा जोतिबा फुले जयंती उत्साहात साजरी
मिरजेत महात्मा जोतिबा फुले जयंती उत्साहात साजरी. दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:- आज मिरजेत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव…
पट्टणशेट्टी फर्म यांच्या वतीने कुपवाड पोलीस स्टेशन ला हेल्मेट वाटप.
पट्टणशेट्टी फर्म यांच्या वतीने कुपवाड पोलीस स्टेशन ला हेल्मेट वाटप. दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:- जिल्हा प्रतिनिधी…
विजयनगर ग्रामपंचायत येथील सभागृहास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव ठरावानुसार घालण्यास ग्रांपचायतीचा व ग्रामसेवक यांचा विरोध.
विजयनगर ग्रामपंचायत येथील सभागृहास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव ठरावानुसार घालण्यास ग्रांपचायतीचा व ग्रामसेवक यांचा…
मिरज येथे लहुजी क्रांंती मोर्चा व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान यांचे संयुक्त विद्यमाने एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर संपन्न.
मिरज येथे लहुजी क्रांंती मोर्चा व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान यांचे संयुक्त विद्यमाने एक दिवसीय…
डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या अध्यक्षपदी अभिजीत आठवले (सर) यांची बिनविरोध निवड :
डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या अध्यक्षपदी अभिजीत आठवले (सर) यांची बिनविरोध निवड :
मिरजेत वादळी वाऱ्याच्या पावसाने मोठे नुकसान.
मिरजेत वादळी वाऱ्याच्या पावसाने मोठे नुकसान. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची तारांबळ. दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क…
भारत देशातील बिहार राज्याच्या ताब्यात असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलना संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन.
भारत देशातील बिहार राज्याच्या ताब्यात असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलना संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन. दैनिक वृत्तवेग…
पै.कुबेरसिंग विशालसिंग राजपूत यांची अहिल्यानगर कर्जत येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये निवड.
पै.कुबेरसिंग विशालसिंग राजपूत यांची अहिल्यानगर कर्जत येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये सलग दुसऱ्यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्याकडून…