विशेष पोलीस महानिरीक्षक श्री.सुनिल फुलारी यांच्या हस्ते शेतकऱ्यांना चोरीचा ट्रॅक्टर ब्लोअर परत.

Spread the love

विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. सुनिल फुलारी यांच्या हस्ते शेतकऱ्यांना चोरीचा ट्रॅक्टर ब्लोअर परत.

दैनिक वृत्तवेग-मिरज जिल्हा प्रतिनिधी-मनोज कांबळे.

दिनांक १९.०१.२०२६ ते २१.०१.२०२६ दरम्यान मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. सुनिल फुलारी (कोल्हापूर परीक्षेत्र) हे सांगली जिल्ह्याच्या वार्षिक परीक्षणासाठी उपस्थित आहेत.काल दिनांक २०.०१.२०२६ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, मिरज तसेच मिरज शहर पोलीस ठाणे येथे त्यांचे वार्षिक परीक्षण सुरू होते. या दरम्यान त्यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यास अचानक भेट दिली.

या भेटीदरम्यान मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याने शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर ब्लोअर चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करून तीन गुन्हे उघडकीस आणले. सदर गुन्ह्यात चोरीस गेलेले सुमारे ११ लाख रुपये किंमतीचे ट्रॅक्टर ब्लोअर हस्तगत करण्यात आले होते.हस्तगत केलेला मुद्देमाल फिर्यादी शेतकऱ्यांना मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. सुनिल फुलारी, मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रणिल गिल्डा व पोलीस निरीक्षक श्री. अजित सिद यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.

यावेळी फिर्यादी शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत मिरज ग्रामीण पोलीसांनी आरोपींना अटक करून चोरीस गेलेला ट्रॅक्टर ब्लोअर शोधून परत मिळवून दिल्याबद्दल समाधान व आनंद व्यक्त केला तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक व संपूर्ण पोलीस विभागाचे आभार मानले.

— (अजित सिद)पोलीस निरीक्षक, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *