शिवसेनेचे धडाडीचे नेते महादेव उर्फ निशिद सावंत यांची सांगली-मिरज विधानसभा संपर्क प्रमुख पदी नियुक्ती

Spread the love

शिवसेनेचे धडाडीचे नेते महादेव उर्फ निशिद सावंत यांची सांगली-मिरज विधानसभा संपर्क प्रमुख पदी नियुक्ती

दैनिक वृत्तवेग

मिरज तालुक्यात शिवसेनेचे संघटन तळागाळापर्यंत पोहोचविणारे धडाडीचे युवा नेते महादेव उर्फ निशिद गोकुळ सावंत यांची शिवसेना पक्षाच्या सांगली व मिरज विधानसभा क्षेत्र संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी त्यांच्या संघटनात्मक कार्याची दखल घेत ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली आहे.

महादेव उर्फ निशिद सावंत यांनी आजपर्यंत शिवसेना युवासेना विधानसभा प्रमुख, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सांगली जिल्हा प्रमुख, शिवसेना शिवउद्योग संघटना पश्चिम महाराष्ट्र संघटक तसेच शिवसेना सहकार सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव या विविध पदांवर कार्य करत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे.

मिरज तालुक्यात शिवसेनेचे विचार आणि उपमुख्यमंत्री ना. एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या जनहिताचे व सर्वांगिण विकासाचे निर्णय घराघरापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी सातत्याने मेहनत घेतली. युवा सेना आणि सहकार सेनेच्या माध्यमातून संघटन बळकट करण्यासाठी त्यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब, ना. आनंदराव अडसूळ साहेब, ना. शंभूराज देसाई साहेब आणि ना. राजेश क्षीरसागर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी काम केले आहे.दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख आमदार दगडू दादाजी सपकाळ साहेब यांनी सांगली दौऱ्यादरम्यान महादेव उर्फ निशिद सावंत यांच्या पक्षनिष्ठ व संघटनात्मक कार्याची दखल घेत उपमुख्यमंत्री ना. एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याकडे त्यांच्या नियुक्तीची शिफारस केली होती. त्यानंतर शिंदे साहेबांनी तात्काळ नियुक्तीपत्र देत त्यांची सांगली व मिरज विधानसभा क्षेत्र संपर्क प्रमुखपदी नियुक्ती जाहीर केली.

या नियुक्तीनंतर महादेव उर्फ निशिद गोकुळ सावंत यांनी पक्षश्रेष्ठींनी दिलेली जबाबदारी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडणार असून शिवसेनेचे संघटन आणखी मजबूत व दखलपात्र करून दाखवू, असा विश्वास व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *