छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करा :- शिवसेनेची मागणी

Spread the love

छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करा :- शिवसेनेची मागणी

दैनिक वृत्तवेग

मिरज : हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत सोशल मीडियावर अवमानकारक व आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करणाऱ्या आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी मिरज शहर पोलीस स्टेशन अंतर्गत महात्मा गांधी पोलीस चौकी तसेच प्रांत कार्यालय मिरज येथे शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

आरोपी “सादिक गवंडी” नावाच्या व्यक्तीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक व समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणारे कथित विधान केले आहे. आला आहे. तसेच संबंधित सोशल मीडिया अकाउंटवर वादग्रस्त ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांच्या प्रतिमांचा वापर करून समाजात तेढ निर्माण करून धार्मिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी संबंधित सोशल मीडिया पोस्टची सखोल चौकशी करून भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत लागू होणाऱ्या कलमान्वये तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी शिवसेना शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण सेना प्रदेशाध्यक्ष विकास सूर्यवंशी, मिरज शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी, उपशहर प्रमुख सुधाकर धोंगडे, उपशहर प्रमुख प्रकाश अहिरे, शिवभक्त संजय वाले, दत्ता रुईकर, अक्षय कोळी, विजय कोळी आदी उपस्थित होते.सदर निवेदन महात्मा गांधी पोलीस चौकी तसेच प्रांत कार्यालय मिरज येथे सादर करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *