
विकासाचा विश्वास – प्रगतीची हमी
अनिता रविंद्र क्षीरसागर मालगाव विद्यमान सरपंच – मालगाव जिल्हा परिषद गट महिला राखीव – सर्वसामान्य इच्छुक उमेदवार
दैनिक वृत्तवेग-(प्रतिनिधी)
मालगाव व परिसराचा सर्वांगीण विकास करणे हेच माझे जीवनध्येय व राजकीय ध्येय आहे. सामान्य जनतेच्या विश्वासावर उभे राहून पारदर्शक, प्रामाणिक व लोकाभिमुख कारभार देणे ही माझी ठाम भूमिका आहे. सरपंच म्हणून काम करत असताना गावाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले असून, पुढील कार्यकाळात गावाला अधिक सक्षम, स्वच्छ, सुरक्षित व आत्मनिर्भर बनवण्याचा माझा संकल्प आहे.
आजपर्यंत गावातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण व दुरुस्ती, पाणीपुरवठा लाईन सुधारणा व नियमित पाणीपुरवठा, एलईडी स्ट्रीट लाईट बसविणे, स्वच्छता अभियान व कचरा व्यवस्थापन, महिलांच्या बचत गटांना प्रोत्साहन, शाळा व अंगणवाडीच्या सुविधा वाढवणे, तसेच वृद्ध, दिव्यांग व गरजू नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे ही महत्त्वाची कामे मार्गी लावण्यात आली आहेत.
सुभाषनगर परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत असताना सुमारे १६ कोटी रुपये खर्चाची भव्य पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. प्रत्येक घराला पाणी कनेक्शन देण्यात आले असून, लवकरच नागरिकांना मुबलक व नियमित पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे.
मालगाव येथे अत्याधुनिक ग्रामसचिवालय मंजूर झाले असून, त्यासाठी आवश्यक ते सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांना शासकीय सेवा अधिक सोयीस्कर व पारदर्शक पद्धतीने मिळणार आहेत.
सुभाषनगर येथे सार्वजनिक स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून तेथे पाण्याची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच सुभाषनगरमधील लिंगायत दफनभूमीकडे जाणारा रस्ता पूर्ण करण्यात आला आहे, त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे.सुभाष नगर येथील मुस्लिम कब्रस्तान कडे जाणारा रोड जाणारा रस्ता करण्यात आला आहे.
पुढील काळात प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचवणे, नवीन बोअरवेल व पाण्याच्या टाक्या उभारणे, सांडपाणी व्यवस्थापन सुधारून स्वच्छ व आरोग्यदायी गाव निर्माण करणे हे प्राधान्य असेल. अंतर्गत रस्ते व शेतरस्त्यांचे मजबुतीकरण, पावसाळ्यात चिखलमुक्त रस्ते, बसथांबा व सार्वजनिक ठिकाणांची सुधारणा करून दळणवळण अधिक सुरक्षित व सोयीचे केले जाईल.
गावातील वीजपुरवठा अधिक सुरक्षित करण्यासाठी अधिक स्ट्रीट लाईट बसवणे, सौरऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देणे व ऊर्जा बचतीवर भर दिला जाईल. आरोग्याच्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य सुविधा बळकट करणे, मोफत आरोग्य तपासणी शिबिरे तसेच महिला व बाल आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल.शिक्षण व युवक विकासासाठी शाळांना डिजिटल सुविधा उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन, खेळाचे मैदान, व्यायाम सुविधा व ग्रंथालय उभारणीवर भर दिला जाईल.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण, बचत गटांना आर्थिक मदत, कौशल्य विकास केंद्र, सुरक्षितता व आरोग्य योजनांची अंमलबजावणी केली जाईल.शेती व ग्रामविकासासाठी सिंचन सुविधा वाढवणे, शेतकऱ्यांना नवीन कृषी योजनांचे मार्गदर्शन, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन, पशुसंवर्धन सुविधा व बाजारपेठ उपलब्ध करून देणे हे धोरण राहील. पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण व स्वच्छता या बाबींवर विशेष लक्ष दिले जाईल.
लोकसहभागातून निर्णय घेणे, प्रत्येक नागरिकाचे प्रश्न ऐकून त्यावर तत्काळ उपाययोजना करणे, भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शक प्रशासन ठेवणे हे माझे ठाम धोरण आहे. विकास हा केवळ शब्द नसून तो कृतीतून दिसला पाहिजे, हा माझा विश्वास आहे.आपल्या सर्वांच्या सहकार्याने मालगावचा सर्वांगीण, शाश्वत व समृद्ध विकास घडवूया.विकास, विश्वास आणि प्रामाणिक नेतृत्वासाठी अनिता रविंद्र क्षीरसागर यांना आपला पाठिंबा द्या.
आपला विश्वास – आमची ताकद!
