जनतेच्या विकासासाठी व न्याय हक्कासाठी माझी उमेदवारी,-सुप्रिया ताई गायकवाड.

Spread the love

जनतेच्या विकासासाठी व न्याय हक्कासाठी माझी उमेदवारी,-सुप्रिया ताई गायकवाड

दैनिक वृत्तवेग पंढरपूर भाळवणी प्रतिनिधी संभाजी साठे.

स्वर्गीय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे स्वप्न साकार करण्यासाठी व युवकांचा बुलंद आवाज आमदार अभिजीत पाटील यांच्या प्रेरणेने जनतेच्या विकासासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी जनतेतून माझी उमेदवारी झालेली आहे असे पत्रक भाळवणी जिल्हा परिषद अभिजीत पाटील गटाच्या उमेदवार सुप्रिया ताई गायकवाड यांनी प्रसिद्धीस दिले भाळवणी जिल्हा परिषद गटातील जनतेने मला निवडून द्यावे असे आवाहनही त्यावेळी त्यांनी केले.

यावेळी त्यांच्यासोबत धोंडेवाडी चे माजी सरपंच प्रकाश देठे तसेच धोंडे वाडी गावचा बुलंद आवाज व गोरगरीब जनतेचे त्यांच्या अडचणीला सतत धावून जाणारे आमदार अभिजीत पाटील यांचे कट्टर समर्थक जोतिनाना देठे प्रगतशील बागायतदार महादेव उत्तम देठे .रवी देठे ,डॉ. राजाभाऊ देठे, मंगेश देठे, माजी सरपंच राजाराम पाटील शंकर देठे महादेव पवार माजी संचालक विलास नाना देठे माजी सरपंच संभाजी राजे देठे बापू गायकवाड ,संतोष कांबळे ,गौतम गायकवाड ,विशाल गायकवाड व धोंडेवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *