भाळवणी गटाचा विकास करायचा असेल तर भाजपला साथ द्या – बंडू गुरव.

Spread the love

भाळवणी गटाचा विकास करायचा असेल तर भाजपला साथ द्या – बंडू गुरव

दैनिक वृत्तवेग भाळवणी प्रतिनिधी – संभाजी साठे

भाळवणी : भाळवणी जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही, असे मत राज्यस्तरीय पुरस्कार विजेते व धोंडेवाडीचे कर्तव्यदक्ष विद्यमान सरपंच बंडू गुरव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या फायद्याच्या अनेक शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या भाजप पुरस्कृत उमेदवारांना मोठ्या फरकाने निवडून द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

सध्या भाळवणी गटात भाजपला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात असल्याचे त्यांनी सांगितले.प्रशांत मालक यांच्या सहवासातून तसेच पांडुरंग परिवाराच्या माध्यमातून जनतेची मोठ्या प्रमाणावर कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग प्रशांत मालकांना निश्चितपणे साथ देईल आणि भाजप पुरस्कृत जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार निवडून देतील, असा विश्वासही गुरव यांनी व्यक्त केला.

भाळवणी गटातील प्रत्येक गावात जाऊन विकासकामांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली असून, त्यामुळे लोकांचा भाजपवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे, असेही सरपंच बंडू गुरव यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सध्या भाळवणी गटात भाजपला पोषक वातावरण असल्याची चर्चा गावागावातील नागरिकांमध्ये सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *