बेडग व मालगाव येथे बुधवारी शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सभा : प्रचार सभेत शिवसेना नेत्यांच्या तोफा धडाडणार :

Spread the love

बेडग व मालगाव येथे बुधवारी शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सभा : प्रचार सभेत शिवसेना नेत्यांच्या तोफा धडाडणार :

दैनिक वृत्तवेग जिल्हा प्रतिनिधी-मनोज कांबळे.

बेडग आणि मालगाव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या जाहीर सभा बेडग आणि मालगाव येथे बुधवारी 12 आणि एक वाजता आयोजित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेनेचे महापालिका क्षेत्र प्रमुख मोहन वनखंडे सर यांनी दिली आहे. मिरज मध्ये ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शिवसेनेच्या प्रचार सभेसाठी खासदार धैर्यशील माने, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम, पैलवान चंद्राहार पाटील, नगरसेवक सागर वनखंडे,नगरसेवक युवराज बावडेकर, स्वर्गीय परशुराम नागरगोजे गटाचे सर्व नेते, अमरसिंह पाटील आणि मिरज तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तरी या सभेसाठी मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ही मोहन वनखंडे सर यांनी केले आहे.

बेडग जिल्हा परिषदेच्या शिवसेनेच्या उमेदवार अस्मिता अंकुश आवळे, बेडग पंचायत समितीचे जनसुराज शक्तीचे उमेदवार कैलास विश्वासराव पाटील आणि नरवाड पंचायत समितीच्या काँग्रेसच्या उमेदवार तनवी सुनील कमलेकर तर मालगाव जिल्हा परिषद गटाच्या शिवसेनेच्या उमेदवार सौ चंद्रिका मनोहर होनमोरे, गुंडेवाडी पंचायत समिती गणाच्या शिवसेनेचे उमेदवार सौ. ललिता अशोक शेजुळ यांच्या प्रचारासाठी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बेडग आणि मालगाव मध्ये प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये शिवसेना दोन अंकी संख्या पर्यंत नक्की पोहोचेल आणि शिवसेना ही किंगमेकरच्या भूमिकेत असेल असे सांगून मोहन वनखंडे सर पुढे म्हणाले, कोणाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे आणि कोणाचा बॅलन्स गेला आहे हे सर्वांना माहीत आहे, त्यामुळे बोलण्यात तारतम्य कोण ठेवावा हे ज्यांनी त्यांनी ठरवावे, तुम्ही जसं बोलाल तशाच पद्धतीचे उत्तर आमच्याकडून मिळेल असा नाव न घेता इशारा मोहन वनखंडे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *