जनसुराज्य युवशक्तीचे प्रदेश अध्यक्ष मा. समीत (दादा) कदम यांनी मतदानाचा हक्क बजावला.

Spread the love

जनसुराज्य युवशक्तीचे प्रदेश अध्यक्ष मा. समीत (दादा) कदम यांनी बजावला मतदानाचा हक्क

(दैनिक वृत्तवेग प्रतिनिधी)-

लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणुकीत जनसुराज्य युवशक्तीचे प्रदेश अध्यक्ष मा. समीत (दादा) कदम यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर त्यांनी सर्व नागरिकांना निर्भयपणे व उत्साहाने मतदान करण्याचे आवाहन केले.“मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आणि कर्तव्य आहे.

देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे,” असे मत मा. कदम यांनी यावेळी व्यक्त केले.तरुणांनी तसेच सर्व मतदारांनी घराबाहेर पडून मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. लोकशाही मजबूत करण्यासाठी जास्तीत जास्त मतदान होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *