
मिरज येथील बेथेसदा स्कूल जवळ एका स्क्रॅप गोडाऊन लागली भीषण आग.
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क प्रतिनिधी अभिषेक कांबळे.
मिरज मधील बेथेसदा स्कूल जवळ एका स्क्रॅप गोडाऊन ला दुपारी २ च्या सुमारास अचानक पणे आग लागली. आग इतकी भयानक आहे की, अग्निशमन विभागाच्या आत्तापर्यन्त आठ गाड्या व अग्निशमन दल व सांगली रेस्क्यू टीम सदस्य शिताफने प्रयत्न करत आहेत. अग्निशामन विभागाचे अधिकारी सुनील माळी स्वतः आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

आग जोराची असल्याने मोठ्या प्रमाणात आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न चालु आहे.आगीचे स्वरूप इतके भयंकर आहे की,भंगार प्लास्टिक असल्याने धूर मोठयाप्रमाणात पसरला आहे. आग लागलेल्या ठिकाणा पासुन १० किलोमीटर लांब त्याचा धूर आकाशात दिसत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशामन विभाग अजुनही प्रयत्न करत आहे.
घटनास्थळावरून माहिती मिळाली की, यापूर्वी देखील सहा महिन्या पाठीमागे याच गोडाऊन ला आग लागली होती.हे गोडाऊन शाहिद राशीद मुजावर व तोहीद राशीद मुजावर यांच्या मालकीचे आहे. असे समजते, आग इतकी मोठी असून सुद्धा सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे स्वरूप पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक जमा झालेले आहेत.लवकरच आगीवर नियंत्रण मिळेल.
