
बावची येथील आरोग्य शिबिरात शंभर हुन अधिक महिलांची मोफत तपासणी
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संजीवनी हॉस्पिटल बावची व संजीवनी वुमन्स हेल्थकेअर आष्टा यांच्या संयुक्त विद्यमाने बावची आणि आष्टा परिसरातील महिला रुग्णांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबीरामध्ये स्त्रियांच्या विविध शारीरिक व्याधी, मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विविध आजार, रजोनिवृत्ती व स्तनातील गाठी, पौगंडावस्थेतील मुलींच्या विविध समस्या या विविध आजारावर मोफत तपासणी व औषधोंपचार करण्यात आले.बरीच वर्षे अपत्य होत नसलेल्या दाम्पत्यांसाठी, “गर्भधारणा व आधुनिक वंध्यंत्व चिकित्सा पद्धती” विषयावर मोफत मार्गदर्शन करण्यात आले.
आष्टा येथील संजीवनी वुमन्स हेल्थकेअर च्या मुख्य स्त्रीरोग व वंद्यत्व चिकित्सा तज्ञ डॉ. सौ. मंजुश्री कोळी व संजीवनी हॉस्पिटल चे प्रख्यात स्त्रीरोगतज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. योगेश जाधव यांनी सदर शिबिरामध्ये महिला रुग्णांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार केले. संजीवनी वूमेन्स हेल्थ केअर आष्टा या रुग्णालयाने, अल्पावधितच हजारो दाम्पत्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करून, पश्चिम महाराष्ट्रात नावलौकिक प्राप्त केल्या बद्दल हॉस्पिटल च्या सर्वेसर्वा डॉ सौ मंजूश्री कोळी व डॉ योगेश जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
जागतिक महिला दिनानिमित्त उपस्थित राहिलेल्या सर्व महिला रुग्णांना तसेच हॉस्पिटलमधील सर्व महिला स्टाफना डॉ. सौ. मंजुश्री कोळी व डॉ प्रविण कोळी यांच्या शुभ हस्ते गुलाब पुष्प देऊन, जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. सदर शिबिराचे आयोजन आष्टा डाक्टर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष व संजीवनी हॉस्पिटल चे डायरेक्टर डॉ. प्रविण कोळी यांनी केले. हे शिबिर यशस्वीरिता पार पडण्याकरिता हॉस्पिटलच्या मुख्यव्यवस्थापिका सौ. सारिका थोरात, नर्सिंग विभाग प्रमुख, सौ. स्वप्नाली सोरटे, सौ सानिका गायकवाड, सौ वैभवी लांडगे, फार्मासिस्ट सो ज्योती शिंदे, कु.गायत्री चव्हाण, श्रीमती अक्काताई मस्के यांनी विशेष परिश्रम घेतले सदर शिबिराप्रसंगी बावची व आष्टा परिसरातील विविध मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. सदर महिला आरोग्य शिबिराचा, बावची व आष्टा परिसरातील शंभर हुन अधिक महिला रुग्णांनी लाभ घेतला.
