
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे
कुपवाड –
दि. २३ ते २६ मार्च २०२५ या कालावधीत इचलकरंजी जि. कोल्हापूर येथे होणाऱ्या कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी सांगली जिल्हा संघामध्ये कुपवाडच्या राणाप्रताप मंडळाच्या तब्बल १७ जनांची निवड झाली आहे. यामध्ये जिल्हा पुरुष संघात सौरभ घाडगे, सागर गायकवाड, बिरु बंगारी, ओम पाटील यांची तर महिला संघात प्रगती कर्नाळे, सौंदर्या हिरेकुर्ब व दिक्षा पाटील यांची निवड झाली आहे.
तसेच जिल्हा किशोर संघात सार्थक हिरेकुर्ब, सोहम पाडळे, वैभव फोंडे, यश काळे, स्वरुपानंद स्वामी यांची तर किशोरी संघात अंजली वाघे, रेशमा मुजावर, आराध्या पाटील अशा १५ खेळाडूंची निवड झाली आहे.
जिल्हा पुरुष संघाचे मार्गदर्शक म्हणून संतोष कर्नाळे, किशोरी संघाचे सह मार्गदर्शक म्हणून शेखर स्वामी यांची निवड झाली आहे.