पुरोगामी संघर्ष परिषदेची मिरज तहसील समोर निदर्शने

बालिकेचा अत्याचाराने खून करणाऱ्या नराधमाला जलदगती खटल्याने फाशी द्या
पुरोगामी संघर्ष परिषदेची मिरज तहसील समोर निदर्शने
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:-
मिरज:- जत तालुक्यातील करजगी गावात चार वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा अमानुष खून करणाऱ्या नराधमाला जलद गती न्यायालयामध्ये खटला चालवून तातडीने फाशी द्या म्हणजे असे प्रकार समाजात पुन्हा घडणार नाहीत अशी मागणी करत मिरज तालुका पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने मिरजेचे तहसील कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. सुरुवातीला सदर नराधमाचा पुतळा चप्पल ने मारण्यासाठी आणला परंतु अशांना चप्पलने सुद्धा मारण्याची लायकी नाही म्हणून फेकून देण्यात आला.
मिरज तालुका पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महिला आघाडीच्या वतीने अशा मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. सदर आंदोलनामध्ये महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस रेणुका बनसोडे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा सुजाता कांबळे, शहर जिल्हा अध्यक्षा शिला बनसोडे, जिल्हा सरचिटणीस सर्जेराव भंडारे, मिरज तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा रमेजा पठाण, जिल्हा उपाध्यक्ष आयेशा होडेकर, महापालिका क्षेत्राध्यक्षा जुबेदा शेख, मिरज शहर उपाध्यक्ष मृणाली करांडे, मिरज तालुका उपाध्यक्ष मुकेश कोठावळे, मिरज शहर उपाध्यक्ष तस्मिया उगारे इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.