वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यास चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची अभ्यास भेट.

Spread the love

वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यास चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची अभ्यास भेट.

दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:- जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे.

सांगली, दि. 13 फेब्रुवारी 2025 –

चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या वाणिज्य विभाग व कॉमर्स असोसिएशनच्या वतीने वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड, सांगली येथे अभ्यास भेट आयोजित करण्यात आली. या भेटीमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना साखर उद्योगाच्या कार्यप्रणालीबाबत प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली.या अभ्यास भेटीच्या वेळी कारखान्याचे चीफ केमिस्ट श्री. भारत तावरे यांनी विद्यार्थ्यांना साखर कारखाना व्यवस्थापन, साखर उत्पादन प्रक्रिया, साखर उद्योगातील नवीन तंत्रज्ञान, कारखान्याच्या कार्यप्रणाली, ऊस गाळप पद्धती तसेच साखरनिर्मितीच्या विविध टप्प्यांबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी ऊस उत्पादनाच्या गुणवत्तेचा साखरनिर्मितीवर होणारा परिणाम तसेच उपपदार्थ निर्मितीविषयीही मार्गदर्शन केले.

या अभ्यास दौऱ्यात महाविद्यालयातील डॉ. विजय साळुंके, प्रा. विनायक पाटील आणि प्रा. स्नेहा छत्रे यांच्यासह महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी साखर कारखान्यातील विविध विभागांची पाहणी करून प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रिया समजून घेतली.या अभ्यास भेटीमुळे विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला आणि साखर उद्योगाची सखोल माहिती मिळाली. महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या वतीने अशा प्रकारच्या शैक्षणिक अभ्यास भेटींचे नियमित आयोजन करण्यात येते, जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगविश्वाचा परिचय होईल आणि त्यांना व्यावसायिक ज्ञान व कौशल्ये विकसित करता येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *