ब्रेकिंग:कुपवाड बाळकृष्ण नगर मध्ये राहत्या घरी गळफास घेऊन युवकाने केली आत्महत्या. (कारण अजुन अस्पष्ट) दैनिक वृत्तवेग…
Category: ताज़ा खबरें
सौर उर्जेवर चालणाऱ्या पाण्याच्या टाकीचे ग्रामपंचायत सावळी येथे उद्घाटन.
———————————————
वीज बिलाला पर्यायी मार्ग पायलट प्रोजेक्ट म्हणून ग्रामपंचायतने उभारलेल्या सौरऊर्जा पाणी टाकीचे ग्रामस्थांना कौतुक.सरपंच सदस्यासह बांधकाम ठेकेदार यांचे ग्रामस्थांनी मांडले आभार.
———————————————
मनोज कांबळे — मिरज प्रतिनिधी
दिनांक 7 जानेवारी 2025
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क,विशेष
———————————————
एका बाजूला अनेक ग्रामपंचायत नळ पाणीपुरवठा योजनेचे वीज बिले थकल्याने कनेक्शन तोडण्याचे प्रकार वाढत चालले असताना याला पर्याय म्हणून सावळी ग्रामपंचायत ने प्रभाग क्रमांक पाच मध्ये सौर ऊर्जावर चालणारी पिण्याचे पाणी टाकीचे बांधकाम पूर्ण केले असून नुकतेच
त्याचे उद्घाटन झाले.यामुळे या अनोख्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या पाणी टाकीबदल परिसरातून कौतुक करण्यात येत आहे.
ग्रामपंचायत सावळी ग्रामपंचायतने सौर उर्जेवरती चालणारी पिण्याचे पाण्याची टाकी प्रभाग क्रमांक पाच मध्ये ग्रामपंचायत च्या स्व-निधीतून सुमारे पाच हजार लिटर क्षमता असलेली टाकी सौर पंप वन एचपी आणि सौर पॅनल वन केजी व्हॅट इतक्या क्षमतेची बसवल्याने परिसरातून नव्याने उभारलेल्या या सौर ऊर्जा युक्त पाण्याच्या टाकीचे पायलट प्रोजेक्ट म्हणून प्राथमिक स्तरावर ग्रामस्थ व परिसरातील इतरांच्या कडून कौतुक करण्यात येत आहे.तसेच प्रभाग क्र ५ चे सदस्य दिपक कारंडे यांनी वेळोवेळी या कामाचा पाठपुरावा करून सदरील प्रकल्प मंजूर करणेस सहकार्य केले.
या पाण्याच्या टाकीचे बांधकाम अतिशय उत्कृष्ट दर्जाचे टिकाऊ झाले असून जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून यासाठी महत्त्वाचे मार्गदर्शन लाभले आहे तसेच सदरचे बांधकाम गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर
श्री संग्राम माने यांनी पूर्ण केले आहे.
सावळी हे गाव औद्योगिक वसाहत कुपवाड परिसराच्या नजीक असून सावळी ग्रा.प. कार्यक्षेत्रात विविध कोल्ड स्टोरेज,फाउंड्री, कारखाने तसेच औषध निर्माण करणारे कारखाने आहेत.
या सौरऊर्जेवरती चालणाऱ्या पाण्याच्या टाकीची संकल्पना पूर्णत्वाकडे नेण्यासाठी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सन्मती गणे उपसरपंच निर्मला कुपवाडे, कुबेर गणे, दीपक कारंडे, बजरंग माळी, अबू समलेवाले, रोहित तांबडे, पूजा बंडगर, छाया मोरे, उषा शिंदे, फिरोजा मुलाणी, प्रदीप कोरे, प्रदीप बंडगर, कल्पना शिंदे, धर्मप्रिया कांबळे, राजू चौगुले, किरण डोंगरे, अजय कांबळे पाणी टाकी उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.
तसेच ग्रामपंचायत अधिकारी
श्री बाबासाहेब खाडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
योग हे अनुभवाधिष्ठ शास्त्ररौप्य महोत्सवीनिमित्त योग संमेलनात मान्यवरांचा सूर
योग हे अनुभवाधिष्ठ शास्त्ररौप्य महोत्सवीनिमित्त योग संमेलनात मान्यवरांचा सूर विश्व योगदर्शन’ आयोजित योग संमेलनास देशभरातून अनेक…
पृथ्वीराज मोहोळ शिवराज राक्षे यांच्यात चांगलीच होणार लढत- पैलवान चंद्रावर पाटील.
पृथ्वीराज मोहोळ शिवराज राक्षे यांच्यात चांगलीच होणार लढत- पैलवान चंद्रावर पाटील ‘महाराष्ट्र केसरी’ मधील वाद मिटवण्यासाठीच…
गगनबावडा तालुक्याच्या विकासाचे मारेकरी!
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क :- मुळ प्रस्तावना.एकूण भाग सात. लेखक श्री तानाजी सखाराम कांबळे. 8080532937. लेखक…
२६ जानेवारी… प्रजासत्ताक दिनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास रि.पा.ई. (आ) सांगली जिल्हा यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन.
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:- मिरज प्रतिनिधी-लखन लोंढे आज दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ…
इचलकरंजी येथे मंगलम परिणय वधु-वर सुचक केंद्राचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा.
मंगलम परिणय वधू वर सूचक केंद्राचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा इचलकरंजी:- येथील मंगलम परिणय…
मानवी हक्काचे उल्लंघन करून कर्ज वसुली बंद करा. विशेष पोलीस महानिरीक्षकांना निवेदन.
मानवी हक्काचे उल्लंघन करून कर्ज वसुली बंद करा: विशेष पोलीस महानिरीक्षकांना निवेदन. दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:कोल्हापूर(…
लाडक्या बहिणींना बजेटनंतर दरमहा २,१०० रुपये मिळणार.
राधाकृष्ण विखे-पाटील यांचे शिर्डीत वक्तव्य. दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क: मार्च महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर बजेटनंतर लाडक्या…
सांगलीत मगरीचे पिलू विकणाऱ्यास नागरिकांनी दिला चोप.
दैनिक वृत्तवेग न्युज नेटवर्क: सांगली : कृष्णा नदीत मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या जाळ्यात मगरीचे पिलू अडकले.…
सांगली :पूर नियंत्रण, पाणी निचर्यासाठी 500 कोटीआयुक्त शुभम गुप्ता : सर्वेक्षण सुरू; उपाययोजनांचा प्रस्ताव जागतिक बँकेला होणार सादर
सांगली :पूर नियंत्रण, पाणी निचर्यासाठी 500 कोटीआयुक्त शुभम गुप्ता : वृत्तवेग न्यूज नेटवर्क: सर्वेक्षण सुरू; उपाययोजनांचा…