

ब्रेकिंग-मिरज खतीब नगर येथे क्रूझर गाडीची सुझुकी चारचाकीला समोरासमोर धडक.
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:-
मिरज-कुपवाड रोड येथे खतीब नगर येथे आज रात्री ९:३० च्या सुमारास मिरजेकडून कुपवाड कडे जाणाऱ्या क्रूझर गाडी क्रमांक MH 09 AU 2702 या गाडीने भरधाव वेगात येत सुझुकी कंपनीची XL6 चारचाकी गाडी नं-MH 10 EK 8191 या गाडीला समोरासमोर धडक दिली. धडक इतकी जोरात होती की सुझुकी गाडीचे बम्पर पुर्ण आत गेले आहे.
या अपघातात सुझुकी गाडी चालकाच्या हातास गंभीर दुखापत झाली आहे.


घटनास्थळावरून माहिती मिळाली की, अपघात झाल्यानंतर क्रुझर चालक याने पलायन केले. त्यामुळे जमलेल्या जमावांनी क्रुझर गाडीच्या समोरील काचा फोडल्या. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. घटनास्थळी महात्मा गांधी पोलीस स्टेशनचे कर्मचारी येऊन पंचनामा चालू आहे.


