मिरजेत आम्ही शिवभक्त संघटनेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

Spread the love

मिरजेत आम्ही शिवभक्त संघटनेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण सेना कार्यालयाचे खासदार श्रीकांत शिंदे ह्यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न.

दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:-

आम्ही शिवभक्त संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने मिरज शहरात पारंपरिक पद्धतीने मंगळवारी रात्री भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेनेचे नेते खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मिरज शहराला भेट देऊन आम्ही शिवभक्त संघटनेचे संस्थापक आणि शिवसेना शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण सेनेचे राज्य प्रमुख विकास सूर्यवंशी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन केले सोबतच हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने आमदार राजेश क्षीरसागर सांगली जिल्ह्याचे ग्रामीण जिल्हाप्रमुख आनंदराव पवार,शहर जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांच्यासह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवकालीन मैदानी खेळ आजच्या पिढीला अवगत होणे गरजेचे असल्याचे सांगत राज्यभर शिवकालीन मैदानी खेळासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले तर यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तर तिथून पुढे खासदार श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या गाठी भेटी घेत विचारपूस करून मिरवणुकीच्या दिशेने निघाले,मिरवणूक स्थळी मिरवणुकीत सामील होऊन उपस्थित शिवप्रेमींना मार्गदर्शन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या खासदार श्रीकांत शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी असंख्य आणि न भूतो न भविष्यती जनसमुदाय शिवप्रेमी यावेळी उपस्थित होते.

मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज,राजमाता जिजाऊ,हिंदुहृदयसम्राट स्व बाळासाहेब ठाकरे,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर,शिवशंकर,आणि नावेत बसलेले राम लक्ष्मण सीता आणि हनुमानाची भव्य मूर्ती या मिरवणुकीचे भव्य आकर्षण होते तर मनमोहक आतिषबाजी,डीजे,आणि लाईट सिस्टीम या मिरवणुकीत पाहण्यासाठी जनसामान्यांची गर्दी वाढली होती. पश्चिम महाराष्ट्रात सर्वात मोठी शिवजयंती म्हणून या मिरवणुकीकडे पाहिलं जात होते. उत्कृष्ट नियोजन आणि चांगल्या पद्धतीने मिरवणुकीची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *