
मिरजेत वादळी वाऱ्याच्या पावसाने मोठे नुकसान.
विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची तारांबळ.
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क :-
आज मिरजेमध्ये मोठया प्रमाणात वादळी वाऱ्याच्या पावसाने हजेरी लावल्याने ठिकठिकाणी झाडे मोठया प्रमाणात पडली. मिरजेतील पंचायत समिती येथे चारचाकी गाडीवर झाड पडल्याने गाडीचे नुकसान झाले. तसेच रेहेमतूल्लाह हॉटेल,वंटमुरे कॉर्नर, चौंडेश्वरी कॉम्प्लेक्स अशा अनेक ठिकाणी जोरात वादळी पाऊस झाल्याने झाडे रस्तावर पडली. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. काही ठिकाणी विद्युत तारेवर झाड पडल्याने सायंकाळी साडेपाच नंतर सर्वत्र विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अचानक झालेल्या पावसाने व्यापारी,शेतकरी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.