भारत देशातील बिहार राज्याच्या ताब्यात असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलना संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन.

Spread the love

भारत देशातील बिहार राज्याच्या ताब्यात असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलना संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन.

दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे.

भारत देशातील बिहार राज्याच्या ताब्यात असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन चालू असून त्यानुसार मिरज तालुका बौद्ध समाजामार्फत आयु. बापूसाहेब माने (मा. प्राचार्य)बोलत होते आणि समस्त मिरज तालुक्यातील बौद्ध बांधव उपस्थित असताना आंदोलनाबाबत पत्रकार बैठक संपन्न झाली. गुरुवारी दिनांक 27/ 3 /2015 रोजी सकाळी 9 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मिरज पुतळा येथे एकत्र जमून रॅलीची सुरुवात होईल.

देश विदेशातील अनेक बौद्ध भिकू बौद्ध बांधव जन आंदोलन करीत आहेत बिहार सरकारचा 1949 चा कायदा रद्द झाला पाहिजे ज्या अर्थी हिंदू बांधवांचे राम मंदिर हिंदूंच्या ताब्यात आहे त्या ठिकाणी बौद्ध भिकूंचा हस्तक्षेप नाही मुस्लिम बांधवांचा मज्जित ताब्यात आहे त्या ठिकाणी बौद्ध भिकूंचा हस्तक्षेप नाही ख्रिश्चन बांधवांचा चर्च ताब्यात आहेत त्या ठिकाणी बौद्ध भिकूंचा हस्तक्षेप नाही शिख बांधवांचा गुरुद्वार ताब्यात आहेत त्या ठिकाणी बौद्ध भिकूंचा हस्तक्षेप नाही मग फक्त महाबोधी महाविहार बुद्धगया येथे इतर ब्राह्मण पुजाऱ्याच्या ताब्यात का ?भारतीय संविधानातले कलम 25 ते 28 नुसार प्रत्येक नागरिकांना धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे त्यांनी आपापल्या धर्माचा वापर करण्यास कोणतीही हरकत नाही मग महाबोधी महाविहार इतर धर्माच्या ब्राह्मण पुजाऱ्याकडे का म्हणून….

माननीय जिल्हाधिकारी सो यांनी माननीय राष्ट्रपती महोदयांना आमच्या निवेदनाची प्रत पुढील कार्यवाहीसाठी पाठवून विशेष लक्ष देण्याची ही विनंती करावी व महाबोधी महाविहार बौद्ध भिकूंच्या ताब्यात मिळावे ही विनंती.समाज हितासाठी देशासाठी नागरिकांनसाठी लोकशाही बळकट करण्यासाठी संविधान संरक्षणासाठी सर्व नागरिकांनी जाग्रुत रहावे असे आवाहन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *