
पै.कुबेरसिंग विशालसिंग राजपूत यांची अहिल्यानगर कर्जत येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये सलग दुसऱ्यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्याकडून माती विभाग १२५ किलो (ओपन गट)महाराष्ट्र केसरी साठीसलग दुसऱ्यांदा निवड झाली.
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:-

आपल्या मिरज शहराचे नामांकित पैलवान कुबेरसिंग विशालसिंग राजपूत यांची अहिल्यानगर कर्जत येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये सलग दुसऱ्यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्याकडून माती विभाग १२५ किलो (ओपन गट)महाराष्ट्र केसरी साठी निवड झाली आहे.कुस्ती खेळा मध्ये पै.अमोल खंबाळे,पै.कृष्णा शेंडगे,पै मल्लू पाटील,पै सुदेश ठाकूर,पै पृथ्वीराज पवार पै जोतिराम वाझे,पै सुजित हंडेपाटील,डॉ पॉल चाको आणि कोच आकाश राजपूत यांचे मार्गदर्शन लाभले आहे.महाराष्ट्र केसरी साठी निवड झालेले मिरज भागातील आज पर्यंतच्या इतिहासतले पहिलेच पैलवान कुबेरसिंग राजपूत हे आहेत त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
