राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जयंत पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Spread the love

दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:-

जयंत राजाराम पाटील (फेब्रुवारी १६, इ.स. १९६२ – ) हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवारचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

जयंत पाटील यांचा जन्म सांगली येथे झाला. राजारामबापू पाटील यांचे ते चिरंजीव आहेत. ते सिविल इंजिनीअर आहेत. वडिलांच्या आकस्मित निधनानंतर त्यांना पुढील शिक्षण जे परदेशात घ्यायचे होते ते घ्यायला जाता आले नाही, नंतर ते शेकाप मधून राजकारणात रूजु झाले. यानंतर त्यांनी शरद पवारांसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला व नंतर राष्ट्रवादी असा प्रवास त्यांचा झाला. जयंत पाटील यांनी महाराष्ट्राचा नऊ वेळा अर्थसंकल्प मांडला आहे. सध्या ते महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाराष्ट्रातील एक प्रमुख आणि महत्त्वाचे राजकारणी म्हणून ओळख आहे. राजकारणातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाला उभारी आणि प्रसार करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्र विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते देखील आहेत. जयंत पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते.

राज्याचा सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात ते ग्रामविकासाचे कॅबिनेट मंत्री होते. २००८ साली मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी राजीनामा दिला होता त्यानंतर जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात राज्याचे गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांनी सांगली जिल्ह्यात अनेक सहकारी संस्थांमार्फत ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे. ते १९९० पासून विधानसभेत इस्लामपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचे वडील स्व.राजारामबापू पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते होते. जयंत पाटील यांनी आपल्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यात अनेक विकासकामे केली आहे. जयंत पाटील हे महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदामंत्री आहेत.

भुषविलेली पदे

*संसदीय राजकारणात
अर्थमंत्री
ग्रामविकासमंत्री
गृहमंत्री
जलसंपदा मंत्री
*पक्षिय राजकारणात
गटनेते(विधानसभा), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (२०१०-२०२३)
प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *