साताऱ्यात २०० कोटींचे अमली पदार्थ जप्त : चौघांना अटक

Spread the love

पिंपोडे बु : दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क

नाकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) मुंबई युनिटने कोरेगाव तालुक्यातील विचुकलेमध्ये मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पथकाने २०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. त्यामध्ये कोकेन, गांजा व कॅनेबीज या प्रकारच्या जवळपास २२ किलो अमली पदार्थांचा समावेश आहे. या कारवाईत चौघांना अटक करण्यात आली आहे. विचुकलेसारख्या गावातून कोट्यवधींचे ड्रग्या सापडल्याने मुंबईतील ड्रग्जचे सातारा कनेक्शन समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मुख्यसंशयित सिद्धेश पवार, ऋषीकेश पवार, प्रतीक पवार प्रथमेश पवार अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

एनसीबी मुंबईचे विभागीय अतिरिक्त आयुक्त अमित चावटे यांच्या नेतृत्वाखाली जानेवारी महिन्यात २०० ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले होते. त्या कारवाईनंतर एका आंतरराष्ट्रीय कुरिअर कंपनीच्या कार्यालयात ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या पार्सलची तपासणी करण्यात आली. तेथून प्राप्त माहितीच्या आधारे तांत्रिक व गोपनीय माहितीचा अभ्यास करण्यात आला.

यातूनच आणखी अंमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची माहिती मुंबई विभागीय युनिटला मिळाली. याचदरम्यान ते अंमली पदार्थ नवी मुंबई भागात असल्याचे समोर आले. त्या आधारे टाकलेल्या छाप्यात अंमली पदार्थांचा मोठा साठा हाती लागला. या कारवाईत उच्च दर्जाचे १२ किलो कोकेन, ५ किलो वजनाचा हायड्रोपोनिक गांजा व ६ किलो वजनी कॅनाबीज जप्त करण्यात आले. या अंमली पदार्थांची २०० पाकिटे होती. तसेच संशयितांकडून १ लाख ६० हजार रुपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली. या कारवाईत संशयितांना अटक करण्यात आली.

मुंबईतील एनसीबीच्या या कारवाईनंतर बिचुकले, ता. कोरेगाव येथे अंमली पदार्थ विरोधी सेलच्या मुंबई शाखेच्या अधिकाऱ्यांकडून काही संशायास्पद बाबींची तपासणी करण्यात आली. मात्र, या तपासाबाबत गोपनियता बाळगण्यात आली आहे. प्राथमिक माहिनुसार मुळचा बिचुकले येथील परंतु कामासाठी मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या एका तरुणाचा अंमली पदार्थांशी संबंधित घटनेत संशयास्पद संबंध आहेत. अंमली पदार्थ विरोधी सेलच्या अधिकाऱ्यांनी त्यानुसार बिचुकले गावात तपासणी केली. यासाठी पाच संबंधित अधिकारी गावात तळ ठोकून होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *