








लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न मिळावा व अन्य मागण्यांसाठी वाटेगाव येथे आमरण उपोषण
मागासवर्गीय वंचित संघ व क्रांतिवीर फकीरा राणाजी सामाजिक प्रतिष्ठान यांच्या पुढाकारणे उपोषण सुरु
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क वाटेगाव :-
काल दि. १०फेब्रुवारी २०२५ रोजी वाटेगाव येथे सा लो डॉ अण्णा भाऊ साठे क्रांती सेना व सा लो डॉ अण्णा भाऊ साठे व क्रांतीवीर फकिरा राणोजी सामाजिक प्रतिष्ठान आणि आम्ही सर्व मागासवर्गीय वंचित संघ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे संस्थापक अध्यक्ष श्री मोहनराव वामन कांबळे व सौरभ प्रकाश साठे वंशज फकीरा राणोजी साठे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र यांनी आमरण उपोषनास सुरवात केली.उपोषणास कारण की आत्ताचे सरकार मुख्यमंत्री झाल्यापासून बऱ्याच कामांना गती देत आहे.परंतु अण्णाभाऊ साठे अजुनही उपेक्षितच आहेत.
आपल्या सरकारकडून अण्णाभाऊ साठे यांना न्याय मिळावा. व”भारतरत्न”या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे असे मुख्यमंत्री यांना देण्यात येणाऱ्या निवेदनात म्हटले आहे.
मागण्या पुढीलप्रमाणे
१) डॉक्टर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा. २) लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे स्मारक वाटेगाव आणि चिरागनगर ( मुंबई ) या ठिकाणचे स्मारकाचा विषय लवकरात लवकर मार्गी लावावा तसेच क्रांतीवीर फकीरांच्या स्मारकासाठी सुद्धा विचार करण्यात यावा. ३) अ, ब, क, ड वर्गीकरणाची समिती स्थापन झाली असून अद्याप कोणत्याही कामाला सुरुवात झालेली नाही. ४) लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळामध्ये ज्या जाचक अटी आहेत त्यामुळे गोरगरिबांना कर्ज मिळण्यास मुश्किल झालेले आहे तरी त्या अटी शिथिल करून गोरगरिबांना कर्ज उपलब्ध करून द्यावे. या प्रमुख मागण्या आहेत.
या आंदोलनास विविध पक्ष संघटनाचा व मान्यवराचा पाठींबा आहे.श्रीमती सावित्री माई साठे,सचिन भाऊ साठे,सौरभ भाऊ साठे,श्रीकांत साठे, किरण साठे,विष्णू भाऊ कसबे, प्राध्यापक सुकुमार कांबळे सर,जनार्दन साठे,संदीप तात्या ठोंबरे, कॉ. गणपत भिसे,अशोक लोखंडे, भास्कर नेटके,गणेश जाधव GD, गणेश वायदंडे,विजय दाणाणे,राहुल घाटगे,विकास बल्लाळ,संतोष चांदणे, त्रिंबक साठे,मोहन साठे,यशवंत साठे, शशिकांत साठे,विकास साठे,आनंदा साठे,योगेश साठे,प्रदीप साठे,सूरज साठे,अमित साठे,नेताजी मस्के, संदीप घस्ते,प्रताप साठे,भरत साठे, प्रेम साठे.