ड्रग्ज म्हणजे नक्की असतं तरी काय? काय असतात ‘ड्रग्ज’ घेणाऱ्यांची लक्षणे.

Spread the love

ड्रग्ज म्हणजे नक्की असतं तरी काय? काय असतात ‘ड्रग्ज’ घेणाऱ्यांची लक्षणे

एमडी हा एक रासायनिक अमली पदार्थ आहे. बहुतेक वेळा पांढऱ्या किंवा पिवळसर रंगाच्या भुकटीच्या स्वरूपात तर काही वेळा कॅप्सूलच्या स्वरूपात तो वितरित होतो. त्यामुळे तोंडावाटे गिळून खाता येतो अथवा नाकातून ओढता येतो. व्यसनी व इतर पदार्थांसह त्याचे सेवन करतात.

ड्रग्स म्हणजे नक्की काय ?

भारतात तरुणांमध्ये ड्रग्स घेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ज्या पदार्थाच्या सेवनाने माणसाला विशिष्ट प्रकारची सुस्ती, नशा, तार किंवा धुंदी येते. त्यांना मादक पदार्थ किंवा अमली पदार्थ म्हणजेच ड्रग्स म्हणतात. अफू व त्यापासून तयार केलेले मॉर्फीन, हेरॉईन इ. पदार्थ, कोकेन, भांग, गांजा, चरस (हशिश) या पदार्थाचा मादक पदार्थात समावेश केला जातो.

• ब्राऊन शुगर, झंडूबाम रुमालवर टाकून त्याचा नाकाद्वारे वास घेतात. यातून त्यांना नशा येते. • स्पिरीटचाही नशेसाठी अशाचप्रकारे वापर केला जातो. • अति शौकीन लोक सिंथेटीक अमली पदार्थ आणि आता घातक जीवघेणा एमडीचा (मेफेड्रॉन) वापर करतात. • इतकेच नाही तर मॅजिक मश्रूम, एलसीडी, शिलावती, वेदनाशामक गोळ्या, व्हाईटनर यांचाही वापर ड्रग्स म्हणून केला जातो.

या देशांतून होतो पुरवठा.

शेजारील देशातून म्हणजेच पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश, अफगाणिस्तान, भूतान इथून ड्रग्स आपल्या देशात येतात. याची किंमतही लाखो-करोडो रूपयात असते. याची खरेदी विक्रीही सांकेतिक भाषेत म्हणजेच खुणांच्या माध्यमातून होते.

‘हशीश’ सारखे अंमली पदार्थ नेपाळमधून पुरवले जातात. नायजेरियामधून भारतात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची तस्करी केली जाते. नायजेरियन विद्यार्थी वा कपड्यांचे व्यापारी या माध्यमातून ही तस्करी केली जाते.

हे आहेत ड्रग्स घेणाऱ्यांची लक्षणे

• मुलांच्या वागण्यात अचानक बदल होतो. • अभ्यासात, खेळ किंवा अन्य कार्यक्रमात त्याचे मन न लागणे. • घरात इंजेक्शन अथवा सिरिंज आढळणे. • डोळे लाल, निस्तेज होणे, डोळ्यांखाली सूज येणे. •बोलताना अडखळणे, उभे राहण्यासाठी त्रास होणे. • भूक न लागणे. • वजन कमी होणे. • व्यक्तिगत स्वच्छता, कपड्यांबद्दल बेफिकिरीने वागणे. • निद्रानाश • व्यसनाचा परिणाम फुप्फुस, स्मरणशक्ती, अवयव निकामी होणे. • अस्वस्थता, मानसिक आजार होणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *