
धोंडेवाडी ग्रामपंचायतचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर
पंढरपूर प्रतिनिधी
धोंडेवाडी ग्रामपंचायतचे प्रभाग निहाय आरक्षण तहसीलचे अव्वल कारकून जाधव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
यावेळी त्यांच्या समवेत ग्राम महसूल अधिकारी उदगावे भाऊसाहेब ग्राम सेवक पाटील भाऊसाहेब धोंडेवाडी चे कर्तव्यदक्ष सरपंच बंडूभाऊ साहेब ग्रामपंचायत सदस्य नितीन इंगळे साहेब धोंडेवाडी चे पोलीस पाटील नितीन पाटील माजी उपसरपंच शहाजी देठे, हरिभाऊ देठे, माझी उपसरपंच शहाजी नामदेव देठे व वाघाडवाडी सावंत वस्ती ताटे वस्तीचे कर्तव्यदक्ष आदर्श समाजसेवक दामू अण्णा ताटे ग्रामपंचायतचे आजी-माजी सर्व सदस्य ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात हजर होते.

यावेळी आरक्षण पुढीलप्रमाणे प्रभाग क्रमांक एक ना मा प्रवर्ग स्त्री सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण प्रभाग क्रमांक दोन अनुसूचित जाती स्त्री आणि सर्वसाधारण प्रभाग क्रमांक तीन ना मा प्र सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण प्रभाग क्रमांक चार अनुसूचित जाती सर्वसाधारण स्त्री सर्वसाधारण स्त्री अशा प्रमाणे आरक्षण जाहीर झालेले आहे.

