

‘महिषासुरमर्दिनी’चा दहावा वर्धापनदिन’ मोठ्या उत्साहात संपन्न.
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:-
मडगाव (प्रतिनिधी) :
करमणे, सावर्डे येथील माँ महिषासुरमर्दिनी संस्थानाचा दहावा वर्धापन दिन सोहळा सोमवार ३ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे साजरा करण्यात आला. सकाळी ७ वा. अभिषेक पूजा, ८ वा. मंगलाचरण, देवताप्रार्थना, गणपती पूजन, महासंकल्प, पुण्याहवाचन, नांदीश्राद्ध, ऋत्विकवर्णन, मातृकपूजन, सग्रह देवीयाग, १०.३० वा. राम तारक मंत्रजप, १२ वा. पूर्णाहुती आचार्यपुजा, प्रार्थना, आशिर्वाद, १२.३० वा. महाआरती त्यानंतर तीर्थप्रसाद, १.३० वा. महाप्रसाद, ४.३० वा. भजन, ७वा. महाआरती, तीर्थप्रसाद नियमाप्रमाणे झाले.भाविक यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.हा सोहळा देवस्थानाचे संस्थापक डॉ. डी. एस. नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
यावेळी मडगाव चे आजी-माजी आमदार, राजकीय तसेच सामाजिक नेते व मासिक सारांश संपादक डॉ.अनिल दबडे सर ,दैनिक वृत्तवेगचे सांगली जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे,पुणे जिल्हा प्रतिनिधी किरण नागरगोजे,गणेश कबाडे,उमेश दरवंदर ,प्रतिक साळुंखे,अन्य मान्यवर उपस्थित होते.