


रक्तदान म्हणजे दृष्टिकोन दान होय! जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.विक्रमसिंह कदम:
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:- जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे.
रक्तदान करणे म्हणजे स्वतः च्या आचरणातील दृष्टिकोन स्पष्ट होणे. मानवतेच्या भावनेने जात, पात , धर्म, पंथाचा विचार न करता रक्तदानाची संख्या वाढली पाहिजे असे आव्हान प. व. पा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शलयचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यानी केले.प्रजासत्ताक दिनानिमित्त शामरावनगर येथे संगली शहर खलिफा मुस्लिम नाभिक मंडळ व जन कल्याण आरोग्य सेवा फाउंडेशन याच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान व नेत्र तपासणी शिबीर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी डॉ. कदम होते. यावेळी रुग्ण हक्काची सनद फलकाचे उदघाटन दिडशे नागरिकांनी सदर उपक्रमात लाभ घेतला. रक्तदातत्यांना प्रमाणपत्र प्रमाण पत्राचे वितरण करण्यात आले.
भव्य मंडपामध्ये चला खरे राष्ट्रप्रेमी बनुया! राष्ट्रीय एकतेचे संदेश देणारे पोस्टर्स प्रदर्शन लक्ष वेधून घेत होते . कार्यक्रमाची प्रास्ताविक रमजान खलिफा, स्वागत शब्बीर खलिफा, यांनी केले. यावेळी रज्जाक नाईक, शरद नलवडे, किरण कांबळे, कवीवर्य बन्सीलाल कदम, महिला कर्जमुक्ती अभियानाचे विजयालक्ष्मी विनोद कदम, सलून असोसियन चे विक्रम गागधर , संत सेना महाराज मंडळ चे अरुण साळुंखे, प्रमोद माळी , सिव्हिल हॉस्पिटल रक्तपेढी चे डॉ. निलेश पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. जमीर खलिफा , शब्बीर खलिफा, शाहरुख खलिफा, हुसेन खलिफा, रेहान खलिफा, सुफियान खलिफा, रियाज खलिफा, ताजुद्दिन खलिफा, निहाल खलिफा, सलिम खलिफा, अजीम खलिफा, जन कल्याण आरोग्य सेवा फाऊंडेशन सांगली जिल्हा उपाध्यक्ष व सचिव रमजान खलिफा राजेश साळुंखे, अयुब सुतार यांनी परिश्रम संयोजन केले. आभार जमीर खलिफा यांनी केले.