
सामाजिक बांधिलकीचा आदर्श : परसु (अण्णा) मगदूम यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर,५० हून अधिक युवकांचे रक्तदान
जिल्हा प्रतिनिधी :मनोज कांबळे
वड्डी गावचे सुपुत्र तसेच विजयनगर झेंडा चौक परिसरातील आधारस्तंभ म्हणून ओळख असलेले सामाजिक कार्यकर्ते परसु (अण्णा) मगदूम यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. समाजसेवेचा संदेश देत वाढदिवस साजरा करण्याच्या उद्देशाने विजयनगर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून तब्बल ५० हून अधिक तरुणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

रक्तदान शिबिराचे आयोजन झेंडा चौक व पैलवान ग्रुप, विजयनगर (म्हैसाळ) यांच्या वतीने करण्यात आले होते. शिबिराच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होणार असल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.परसु (अण्णा) मगदूम हे सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या कामांमध्ये नेहमीच अग्रेसर राहिले आहेत.






त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन युवकांनी मोठ्या संख्येने रक्तदानात सहभाग नोंदविला. वाढदिवस केवळ केक कापून किंवा औपचारिक कार्यक्रम करून न साजरा करता समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी परसु (अण्णा) मगदूम यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. रक्तदान करणाऱ्या युवकांचेही विशेष अभिनंदन करण्यात आले. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण असून सामाजिक एकोपा आणि मानवसेवेची भावना दृढ करणारा हा उपक्रम ठरला.
“रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या संदेशाला अनुसरून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामुळे वाढदिवसाला समाजसेवेची अर्थपूर्ण जोड मिळाली. विजयनगर परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत आयोजक झेंडा चौक व पैलवान ग्रुप, विजयनगर (म्हैसाळ) यांचे अभिनंदन केले.
