संगीतरत्न अब्दुल करीम खाँ.पुण्यतिथी सेवा मंडळ, मिरज आयोजित 91 व्या संगीत समारोहाचे मिरज येथे आयोजन.

Spread the love

संगीतरत्न अब्दुल करीम खाँ.पुण्यतिथी सेवा मंडळ, मिरज आयोजित 91 व्या संगीत समारोहाचे मिरज येथे आयोजन

२६, २७ व २८ जानेवारी या तीन दिवसात कार्यक्रमाचे आयोजन.

दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क :

संगीतरत्न अब्दुल करीम खा यांच्या 91 व्या पुण्यतिथीनिमित्त मिरज जिल्हा सांगली येथे सालाबाद प्रमाणे संगीत समारोहाचे आयोजन होत आहे. दरवर्षी या संगीत सोहळ्याला देशभरातील अनेक दिग्गज कलाकार हजेरी लावून संगीत सेवा देतात. यावर्षी सुद्धा या उत्कट अशा सोहळ्याला जगप्रसिद्ध हार्मोनियम वादक आणि पं. आप्पासाहेब जळगावकर यांचे पट्ट शिष्य श्री. संतोष घंटे यांची हार्मोनियम साथसंगत आणि सहवादन होणार आहे. संतोष घंटे हे नेहमीच हार्मोनियम चा प्रचार आणि प्रसार गेल्या पंधरा वर्षापासून अवघ्या जगभरात करत आलेले आहेत. त्यांचे हार्मोनियमचे सोलो कार्यक्रम आजवर एकूण 37 देशांमध्ये झालेले आहे.

अनेक दिग्गज कलाकारांना त्यांनी साथसंगत केली असून यावर्षी ते मिरज येथे संगीतसेवा देत आहेत. सदर संगीत कार्यक्रमास शेहनाई वादक पं.शैलेश भागवत यांच्या सोबत श्री.संतोष घंटे यांचे सहवादन होणार आहे.हार्मोनियमला एक मुख्य वाद्य म्हणून स्थान आणि प्रसिद्धी मिळावी म्हणून हार्मोनियम वाद्याचा प्रचार आणि प्रसार अविरत करत राहीन असे आवाहन श्री.संतोष घंटे यांनी केले.तरी सदर संगीत सोहळ्याला सर्व संगीतप्रेमी आणि रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहून या तीन दिवसीय संगीत आयोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *