
मंगलम परिणय वधू वर सूचक केंद्राचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा
इचलकरंजी:- येथील मंगलम परिणय बौद्ध वधू वर सूचक केंद्र इचलकरंजी ( कबनुर) चा ४ था वर्धापन दिन सोहळा रोटरी सेंट्रल हॉल इचलकरंजी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्व प्रथम याचे उद्घाटन माजी उपनगरध्यक्ष रविसाहेब रजपूते यांच्या मंगल हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बौद्ध उपासक प्रमोद सिद्राम कांबळे – अनुरकर होते.
यावेळी मंगलम परीणय बौद्ध वधू वर केंद्राचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे मुख्य संयोजक अरुण रंजना कांबळे म्हणाले की,गेल्या ४ वर्षात आमच्या संस्थेने जवळपास ८४ स्थळे यशस्वी रित्या जुळवली आहेत.शेकडो मेळावे घेतली आहेत.मुंबई,पुणे,सांगली,सातारा,कराड,कोल्हापूर,सोलापूर, बेळ गाव आदी जिल्ह्यातील हजारो वधू – वर यांनी आपली नावे नोंद केली आहे.या सर्वांशी आम्ही वेळी वेळी संपर्क साधत असतो.दररोज वधू – वर यांची पसंती – नापसंती या बाबत पाठपुरावा करत असतो.ऑफिस आमचे दररोज चालू असते.४ वर्षात आम्ही लोकांचा विश्वास कमावला आहे तो विश्वास कायम तसाच रहावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
या नंतर सकाळच्या पहिल्या सत्रात बौद्ध वधू वर पालक परिचय मेळावा घेण्यात आला.यामधे सांगली,कोल्हापूर,सातारा, बेळगांव जिल्ह्यातील वधू वर पालकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
दुपारच्या दुसऱ्या सत्रात आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांचा सत्कार मुंबईचे माजी कस्टम अधिकारी मदन लाला पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यामधे
१) निशांत गुलाब कांबळे – बौध्द
अनामिका विनोद कुलकर्णी – ब्राह्मण
२) विनायक अर्जुन मुसळे – देवांग कोष्टी
रुपाली केशव कोठावळे – बौद्ध
३) निखिल बटू तराळ – बौद्ध
नसरीन शहाजहान जमादार – मुस्लिम
४) जयसिंग गजानन जगदाळे – मराठा
भाग्यश्री सुरेश चौगुले – जैन
५) अमित दिगंबर तूपलोंडे – बौद्ध
निलोफर झाकीर खलिफ – मुस्लिम
६ ) विकी अशोक कांबळे – बौध्द
इंद्रायणी अनिल नायकवडे – मराठा
७) मोहन रामचंद्र काजवे – स्वकुळ साळी
दिव्या दीपक पाटील – मराठा
आदी आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
सायंकाळी तिसऱ्या सत्रात जयभीम आयडॉल बुद्ध भीम गीतांचा कराओके गायन स्पर्धा आयोजित करण्यात आला.यामधे अधिक स्पर्धकांनी भाग घेतला.
जयभीम आयडॉल -२०२५ चा विजेता ठरला सूरज कांबळे ( रा. गर्जन,कोल्हापूर) यांनी “भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी” हे गीत गायले होते.
व्दितीय क्रमांक अतुल सुरेश कांबळे (रा.नृसिंहवाडी) याने पटकावला.”भीमराव एकच राजा” हे गीत गायले होते.
तृतीय क्रमांक गोरख कांबळे ( रा.यळगुड) यांनी मिळवला.त्यांनी “रंग दिला तू चित्र काढिले” हे गीत गायले.
तर उत्तेजनार्थ कीर्ती माणगावे (रा.नृसिंहवाडी ) हिला मिळाला.हिने “संविधानाच पुस्तक हातात भीमराव बसलाय रथात” हे गीत गायले.
या स्पर्धेचे परीक्षक संगीतकार सर्जेराव कांबळे ( इचलकरंजी),गायक विश्वनाथ कांबळे ( माले मुडशिंगी) यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सेक्रेटरी अक्षरा अरुण कांबळे, अदिती गायकवाड, विशाखा कांबळे,प्रथमेश कांबळे,संतोष कुरळे,अनिल केंगारे,दीक्षा कांबळे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुंधरा कांबळे आणि सिद्धार्थ शिंदे सर यांनी केले.