


चिंतामणराव व्यापाऱ महाविद्यालयात भव्य मार्केट फेस्ट 2025 संपन्न.
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:
जिल्हा प्रतिनिधी-मनोज कांबळे.
सांगली: चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या वतीने आयोजित मार्केट फेस्ट 2025 या भव्य उपक्रमाचे आयोजन उत्साहात पार पडले. या फेस्टचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योगपती रोटेरियन धर्मेंद्र खिलारे यांच्या हस्ते झाले, तर प्रमुख उपस्थिती महाविद्यालय विकास समितीचे सदस्य रवींद्र ब्रम्हनाळकर सर यांनी लाभली. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. शार्दुल ठाकूर सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी झाला.
मार्केट फेस्ट 2025 चे समन्वयक IQAC समन्वयक विजय साळुंके, प्रा. एन. के. आपटे, डॉ. महेंद्र बागुल, डॉ. किशोरकुमार भोसले, डॉ. आशिष पुराणिक, प्रा. लीना काक्रंबे, प्रा. विनायक पाटील, प्रा. पवन मनुरकर, प्रा. सुशील बनसोडे यांच्यासह सर्व प्राध्यापक, कर्मचारी, माजी विद्यार्थी, पालक, तसेच विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींची उपस्थिती होती.फेस्टमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी 40 स्टॉल्स सादर केले होते. या स्टॉल्समध्ये कीचेन, ड्रायफ्रूट्स, इन्विटेशन ज्वेलरी, सेंद्रिय गूळ, चाटचे प्रकार, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स, पेस्ट्री यांसारख्या विविध प्रकारांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या स्टॉल्सवर विविध आधारांवर परीक्षण केले गेले आणि क्रमांक दिले जाणार आहेत.या मार्केट फेस्ट आयोजनासाठी आर्थिक सहाय्य डॉक्टर शार्दुल ठाकूर, डॉक्टर आशिष पुराणिक प्रा. लीना काक्रंबे प्रा. गजानन नागरगोजे व प्रा. चैतन्य कुलकर्णी यांनी केले.कार्यक्रमाची बातमी कव्हर करण्यासाठी वेगवेगळ्या वृत्तपत्रांचे व टीव्ही चॅनेल्सचे पत्रकार उपस्थित होते. त्यांनी सहभागी विद्यार्थ्यांशी, पालकांशी आणि शिक्षकांशी संवाद साधला व या उपक्रमाबद्दलच्या त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या.
या मार्केट फेस्टमध्ये अंदाजे एक लाख रुपयांची उलाढाल झाली असून, विद्यार्थ्यांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.मार्केट फेस्ट 2025 हा उपक्रम महाविद्यालयाच्या शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
प्रभारी प्राचार्य डॉ. शार्दुल ठाकूर.