मिरजेत राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ६८ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त :

Spread the love

गोवा आणि मध्यप्रदेश बनवटीची बेकायदेशीर दारूची तस्करी करणाऱ्यांना दोघांना अटक

दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:

मिरज- पिण्याच्या पाण्याच्या बॉक्सच्या आडून गोवा आणि मध्य प्रदेश बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्यांच्या वर राज्य उत्पादन शुल्क, मिरज विभागाने कारवाई केली आहे. पुष्पा स्टाईलने दारूची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. बियर, विस्की असे दारूचे बॉक्स आणि ट्रक असा एकूण 68 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपी जमीर अकबर मकानदार आणि शब्बीर अल्लाउद्दीन मकानदार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मिरज ते पंढरपूर रोडवर सापळा रुचून सदर कारवाई करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सांगलीचे अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क प्रदीप पोटे, उप-अधीक्षक ऋषिकेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे मिरज-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग वरती सापळा लावुन कारवाई करण्यात आली. गोवा आणि मध्य प्रदेश राज्य निर्मित विदेशी मध्य भरलेला सहाचाकी ट्रक पकडण्यात आला.

विविध ब्रँडचे विदेशी मदयाचे व बिअरचे एकूण 651 बॉक्स जप्त करण्यात आले. 33 लाख रुपये किंमतीचा मद्यसाठा आणि आयशर कंपनीचा सहा चाकी ट्रक असा एकूण 68 लाख 41 हजार 280 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी जमीर अकबर मकानदार आणि शब्बीर अल्लाउद्दीन मकानदार यांना अटक करण्यात आलेली आहे.

सदर कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मिरजचे निरीक्षक दिपक बाळकृष्ण सुपे, जतचे निरीक्षक प्रभात सावंत,अजय लोंढे, लक्ष्मण पोवार, जयसिंग खुटावळे, उदय पुजारी, इरफान शेख, स्वप्नील अटपाडकर, विनायक खांडेकर, पुंडलिक बिरुंगे, कविता सुपने, शाहीन शेख, स्वप्नील कांबळे आदींनी सदरच्या कारवाईत सहभाग घेतला. सदर गुन्हयाचा पुढील तपास राज उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक दिपक बाळकृष्ण सुपे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *