
जबरी चोरी व चोरी करणारे आरोपी जेरबंद करून त्याचेकडून १०,१०,२५०/- रु. चा मुद्देमाल जप्त.
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:
विटा: पोलीस अधीक्षक संदीप घुगे, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करून, मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक, सिकदर वर्धन व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन जबरी चोरीचे गुन्हे करणारे संशयित इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.त्या अनुशंगाने विटा विभागात पेट्रोलिंग करीत असताना सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथकामधील पोह/सुर्यकांत साळुंखे, पोह/संजय पाटील व पोशि / सुनिल जाधव यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, विटा येथील खानापूर ते विटा जाणारे रोडवर बळवंत कॉलेज समोर विना नंबर प्लेट मोटार सायकलीवरून तीन इसम चोरीचे दागिने विक्री करीता येणार आहेत.
नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे विटा येथील बळवंत कॉलेज येथील खानापूर ते विटा जाणारे रोडवर जवळ जावून सापळा लावून थांबले असता तीन इसम विना नंबर प्लेट मोटार सायकलवरून येत असताना दिसले. तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व पथकाने पळून जाण्याची संधी न देता त्यांना मोटार सायकलसह ताब्यात घेवून त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे १) अक्षय महादेव माने, वय २६ वर्षे, रा वलवण, ता आटपाडी २) साहिल कुंडलिक चव्हाण, वय २१ वर्षे, सध्या रा घरनिकी, ता आटपाडी, मूळ रा तुर्ची, तातासगाव ३) सचिन विष्ठ्ठल माने, वय २३ वर्षे, रा घरनिकी, ता आटपाडी अशी सांगितली. सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्यांचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, अक्षय माने याचे पॅन्टच्या खिशामध्ये सोन्याचे दागिने मिळून आले.
त्यास सदर मालाबाबत विचारणा केली असता त्याने सदरचा माल हा विटा पोलीस ठाणे हद्दीतील भूड गावातील दुकानातील वयस्कर व्यक्तीचे गळ्यातील चैन ओढलेला, लेंगरे माधळमुठी रोडला एका वाहन चालकास धक्का देवून गाडीवरून पाडून त्याचे हातातील व गळ्यातील सोन्याचे दागिने व आटपाडी पोलीस ठाणे हद्दीतील करगणी गावातील घरातून चोरी केलेले दागिने असल्याची कबुली दिली.सदर बाबत विटा व आटपाडी पोलीस ठाणेचा क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली. लागलीच त्यांचे कब्जातील माल पुढील तपास कामी सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी पंचासमक्ष जप्त केला आहे.
सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी विटा पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास विटा पोलीस ठाणे करीत आहेत.