
मिरजेत मराठा महासंघाच्या वतीने जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांचा जाहीर निषेध :
महाराणी ताराराणी यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचे पडसाद मिरजेत उमटले :
दैनिक वृत्तवेग जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे
महाराणी ताराराणी यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांचा मिरजेत मराठा महासंघाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. शहरातील महाराणा प्रताप चौकामध्ये निदर्शने करण्यात आली. यावेळी निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.अखिल भारतीय मराठा महासंघाचे राज्याचे सचिव विलास देसाई यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी तात्काळ माफी मागावी. वारंवार महापुरुषांच्या विषयी बदनामी कारक आणि वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी कडक कायदा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळींअखिल भारतीय मराठा महासंघाचे राज्याचे सचिव विलास देसाई, विजय धुमाळ, विनायक सूर्यवंशी, अक्षय मिसाळ, प्रकाश जाधव, अभी चव्हाण, रवी मिसाळ, किरण मिसाळ हे उपस्थित होते.