
सांगली : दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क
लग्नाचे आमिष दाखवून सांगलीतील पोलिस कर्मचाऱ्याने तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यातून तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तिची दिशाभूल करून गर्भपात केला. तसेच लग्नास नकार देऊन तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. : याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी संशयित पोलिस : शिपाई सोहेल इम्तियाज मुल्ला (रा. भालदार गल्ली, खणभाग, सांगलीयाच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
पीडित तरुणी ही कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. संशयित सोहेल मुल्ला व पीडितेची ओळख झाली होती. त्यानंतर सोहेल याने तिच्याशी ओळख वाढवली. तिला लग्नाचे आमिष दाखवले. फेब्रुवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०२२ यादरम्यान सांगलीतील विविध हॉटेल्स, स्वतः च्या घरी तसेच मोटारीत तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तीगर्भवती असल्याचे समजताच संशयिताने तापाच्या गोळ्या असल्याचे सांगून तिला गर्भपाताचे औषध दिले. या औषधामुळे तिचा एक महिन्याचा गर्भपात झाला.
या घटनेनंतर पीडितेने सोहेल याच्याकडे लग्नाबाबत विचारणा केली. मात्र त्याने लग्नास नकार दिला. तिला स्वतः आत्महत्या करण्याची, शारीरिक संबंधाची छायाचित्रे समाजमाध्यमांवर पसरविण्याची तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. पीडित तरुणीने त्याला दिलेले ७० हजार रुपये परत मागितले असता, त्याने शिवीगाळ केली. याप्रकरणी पीडित तरुणीने सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिच्या फिर्यादीची दखल घेऊन पोलिसांनी संशयित सोहेल मुल्ला याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुल्ला याच्याविरुद्ध यापूर्वीही विवाहितेचा जाचहाट केल्याचा गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.