
मिरजेतील महात्मा गांधी चौक, पोलीस ठाणे ची धडाकेबाज कारवाई : जबरी चोरी करणारा चोरटा जेरबंद :
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क: जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे
सोलापुर ते कोल्हापुर हायवेवरील अर्जुनवाड फाट्यावर जबरी चोरी करणारा चोरट्याला महात्मा गांधी पोलीस ठाणे यांनी आरोपी सुमित काळे याला पकडून अटक केले. त्याच्याकडून घड्याळ, सोन्याचे दागिने आणि चाकू असा ३९ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिरजेतील महात्मा गांधी चौक, पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई केली आहे.
मिरज अर्जुनवाड रोडवर रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कारचा दरवाजा उघडुन तीन आरोपींनी चाकुचा चाक दाखवुन जबरी चोरी केली होती. याबाबत महात्मा गांधी चौक, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास चालु असताना तपास पथकातील पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख आणि पोलीस कॉन्स्टेबल मोसीन टिनमेकर यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दाखल गुन्ह्यातील काही मुद्देमाल सुमित काळे हा विक्रीकरीता मिरजेतील नशेमन हॉटेल जवळ घेऊन येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली.
त्यानंतर तपास पथकाने सापळा रचुन आरोपी सुमित शत्रुघ्न काळे यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला वरील प्रमाणे मुद्देमाल एक टायटन कंपनीचे घड्याळ, एक सोण्याचे मणीमंगळसुत्र, एक सोण्याची अंगठी आणि गुन्हा करतेवेळी वापरलेला चाकु असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर आरोपी हा सध्या पोलीस कस्टडीत असुन पुढील तपास सुरु आहे.
सदर कामगिरी ही सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल सुरज पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अभिजीत धनगर, पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख, पोलीस कॉन्स्टेबल मोसीन टिनमेकर, पोलीस कॉन्स्टेबल विनोद चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल बसवराज कुंदगोळ यांनी कौशल्यपूर्वक पार पाडलेली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे करीत आहेत.