
आ. डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांच्या प्रयत्नातून मिरज मतदारसंघासाठी मार्च 2026 च्या अर्थसंकल्पामध्ये 25 कोटीच्या कामांना मंजुरी
दैनिक वृत्तवेग जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे
आ. डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांच्या प्रयत्नातून मिरज मतदारसंघासाठी मार्च 2026 च्या अर्थसंकल्पामध्ये महत्त्वाचे रस्ते विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे. मिरज तालुक्यातील दळणवळण अधिक सक्षम, सुरक्षित आणि वेगवान करण्याच्या दृष्टीने सदर कामे हाती घेण्यात येणार आहेत.

एकूण 25 कोटीच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. या सर्व कामांमुळे ग्रामीण व शहरी भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार असून, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. रस्ते व पूल बांधकामामुळे औद्योगिक आणि कृषी क्षेत्राला चालना मिळून स्थानिक विकासाला गती मिळेल.
ही कामे लवकरात लवकर सुरू करून नियोजित कालावधीत पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.
