नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनींना कराटे येलो बेल्ट प्रमाणपत्रांचे वितरण

Spread the love

नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनींना कराटे येलो बेल्ट प्रमाणपत्रांचे वितरण

दैनिक वृत्तवेग जिल्हा प्रतिनिधी-मनोज कांबळे

कुपवाड : नवमहाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित सौ. आशालता आण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींसाठी “सांगली पॅटर्न कन्या सबलीकरण” अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या येलो बेल्ट कराटे परीक्षा प्रमाणपत्र व बक्षीस वितरण समारंभाचा कार्यक्रम नुकताच सांगली येथील दिपायन मंगल कार्यालयात उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाला पालकमंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील, खासदार मा. विशालदादा पाटील, विधान परिषदेचे आमदार मा. इद्रिस नायकवडी, जिल्हाधिकारी मा. अशोक काकडे, जिल्हा शिक्षणाधिकारी मा. राजसाहेब लोंढे, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडे तसेच सांगली जिल्हा पोलीस प्रमुख मा. संदीप घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती.मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थिनींना येलो बेल्ट व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. प्रमाणपत्र स्वीकारताना विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास व आनंद स्पष्ट दिसून आला.

या यशस्वी विद्यार्थिनींचे सर्वत्र कौतुक होत आहे.कार्यक्रमास नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय आण्णासाहेब उपाध्ये सर उपस्थित राहून विद्यार्थिनींचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी हायस्कूलचे मुख्याध्यापक मा. शिरीष चिरमे सर, क्रीडा शिक्षक सिद्धार्थ कांबळे सर, सुशांत पाटील सर, श्रीमती एम. ए. जाधव मॅडम तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कराटे परीक्षेत मिळालेल्या यशामुळे विद्यार्थिनींच्या आत्मविश्वासात मोठी भर पडली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *