युवा नेते आकाश तिवडे (मेजर) यांना समाज रत्न व समाजभूषण पुरस्कार….

Spread the love

युवा नेते आकाश तिवडे (मेजर) यांना समाज रत्न व समाजभूषण पुरस्कार….

सोलापूर या ठिकाणी युवा भिमसेना सामाजिक संघटना यांच्या वतीने राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार व, माधव नगर मध्ये अजय बनकर बेथेल फाउंडेशन माधवनगर यांचे वतीने समाजरत्न पुरस्कार असे दोन पुरस्कार बहुजन समाजाचे युवा नेते मा. आकाश तिवडे (मेजर) यांना मिळाले.

आकाश तिवडे यांच्या सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक व आरोग्य क्षेत्रांमध्ये , उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल त्यांना समाज भूषण व समाज रत्न असे दोन पुरस्कार मिळाले, त्यांना मिळालेल्या पुरस्कारांमुळे बहुजन समाजामध्ये आनंदाच वातावरण आहे, बहुजन समाजातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या कार्यकर्त्याचा सन्मान होत आहे , ही गोष्ट कौतुकास्पद आहे असा सूर समाज बांधवांमधून उमटत आहे, सांगली कोल्हापूर सातारा व सोलापूर या जिल्ह्यांमध्ये अन्यत्याराचाराच्या विरोधात कायम रस्त्यावरच्या लढाईत सर्वात पुढे असणाऱ्या व्यक्तिमत्वास हा पुरस्कार मिळाल्यामुळे बहुजन समाजामध्ये विशेष करून मातंग समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे , युवा भीम सेनेचे संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे, विजय बनकरी , अमर मगदूम, चंद्रकांत लोंढे, रवि भोरे ,नागनाथ माने, हर्षद मोरे, एलिया माने, मार्क मगदूम, सावंता माने,संतोष तिवडे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा घेण्यात आल्या ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *