नव महाराष्ट्र शिक्षण संस्था कुपवाड यांच्यावतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.

Spread the love

नव महाराष्ट्र शिक्षण संस्था कुपवाड यांचे वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

नव महाराष्ट्र शिक्षण संस्था,कुपवाड, एटीए फ्रेटालाईन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पुणे व सार्थक मेमोरियल ट्रस्ट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अकुज शैक्षणिक संकुल, कुपवाड, अकुज् ड्रिमलॅण्ड, कुपवाड व एम. आय. डी. सी. कुपवाड परिसरामध्ये आज गुरुवार, दि. 9 जानेवारी 2025 रोजी भव्य वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात स्वछंद संगीत महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या ईशस्तवनाने झाली. स्वागत व प्रास्ताविक सौ.आ.आ.उपाध्ये गर्ल्स हायस्कूलचे ज्येष्ठ शिक्षक श्री. डी. एम. माळी सर यांनी केले प्रमुख पाहुण्यांचा परिचय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. आण्णासाहेब उपाध्ये सर यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री मोहन पाटील सर (प्रोग्राम ॲडव्हायझर पर्यावरण प्रकल्प सल्लागार), श्री मनोज कलमकर सर (सी.ए) (एटीए कंपनी), श्री सौरभ शहा सर (ट्रस्टी एस.एम.टी), सौ स्वाती करंदीकर (अध्यक्ष, हिरवळ फाउंडेशन), श्री. राकेश दडनावर (अध्यक्ष, निर्धार फाउंडेशन्) तसेच संस्थेचे अध्यक्ष मा. आण्णासाहेब उपाध्ये सर, उपाध्यक्ष मा.सूरज उपाध्ये सर, संचालक मा.अभिजित शेटे सचिव मा.रितेश शेठ सर,संचालिका सौ.कांचन उपाध्ये मॅडम उपस्थित होते.

मा. सौरभ शहा सर व मा. मनोज कलमकर सर यांनी विद्यार्थिनींना वृक्षारोपणआणि वृक्ष संवर्धन या संदर्भात मौलिक असे मार्गदर्शन व विध्यार्थ्यांना वृक्षा चे महत्व विविध उदाहरणे व दाखले देऊन वृक्ष संवर्धनाची प्रतिज्ञा घेण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर व सर्व विभागाचे मुख्याध्यापक,पर्यवेक्षक,शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांचे समवेत कुपवाड व एम. आय. डी. सी. परिसरामध्ये ५० मोठ्या रोपाचें वृक्षारोपण करण्यात आले.

तसेच प्रमुख उपस्थित पाहुण्यांनी संस्थेमार्फत सुरू असलेल्या शाळांना भेट देवून शाळेमध्ये सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेतली व कौतूक केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सुनीता चौगुले व आभार श्री. कुंदन जमदाडे सर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *