




सौरऊर्जेवर चालणाऱ्या पाणी टाकीचे ग्रामपंचायत सावळी येथे उद्घाटन.
उन्हाळ्याच्या दरम्यान लाईट नसताना निर्माण होणारी पाणीटंचाई दूर होणार असल्यामुळे सौरऊर्जा युक्त बांधलेली पाण्याची टाकी
ग्रामस्थांची तहान भागवण्यास कारणीभूत ठरणार आहे.
वीज बिलाला पर्यायी मार्ग पायलट प्रोजेक्ट म्हणून ग्रामपंचायतने उभारलेल्या सौरऊर्जा पाणी टाकीचे ग्रामस्थांना कौतुक.सरपंच सदस्यासह बांधकाम ठेकेदार यांचे ग्रामस्थांनी मांडले आभार.
मनोज कांबळे —
जिल्हा प्रतिनिधी
दिनांक 7 जानेवारी 2025
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क,विशेष.
एका बाजूला अनेक ग्रामपंचायत नळ पाणीपुरवठा योजनेचे वीज बिले थकल्याने कनेक्शन तोडण्याचे प्रकार वाढत चालले असताना याला पर्याय म्हणून सावळी ग्रामपंचायत ने प्रभाग क्रमांक पाच मध्ये सौर ऊर्जावर चालणारी पिण्याचे पाणी टाकीचे बांधकाम पूर्ण केले असून नुकतेच
त्याचे उद्घाटन झाले.यामुळे या अनोख्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या पाणी टाकीबदल परिसरातून कौतुक करण्यात येत आहे.
ग्रामपंचायत सावळी ग्रामपंचायतने सौर उर्जेवरती चालणारी पिण्याचे पाण्याची टाकी प्रभाग क्रमांक पाच मध्ये ग्रामपंचायत च्या स्व-निधीतून सुमारे पाच हजार लिटर क्षमता असलेली टाकी सौर पंप वन एचपी आणि सौर पॅनल
वन के. डब्ल्यू व्हॅट इतक्या क्षमतेची बसवल्याने परिसरातून नव्याने उभारलेल्या या सौर ऊर्जा युक्त पाण्याच्या टाकीचे पायलट प्रोजेक्ट म्हणून प्राथमिक स्तरावर ग्रामस्थ व परिसरातील इतरांच्या कडून कौतुक करण्यात येत आहे.तसेच प्रभाग क्र ५ चे सदस्य दिपक कारंडे यांनी वेळोवेळी या कामाचा पाठपुरावा करून सदरील प्रकल्प मंजूर करणेस सहकार्य केले.
या पाण्याच्या टाकीचे बांधकाम अतिशय उत्कृष्ट दर्जाचे टिकाऊ झाले असून जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी विभाग विभागाकडून यासाठी महत्त्वाचे मार्गदर्शन लाभले आहे. जि प सांगली यांत्रिकी विभागाचे उपअभियंता
श्री नदाफ, उप सहाय्यक
अभियंता श्री शितोळे यांचे मार्गदर्शनाखाली सदरचे बांधकाम गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर श्री संग्राम माने यांनी पूर्ण केले आहे.
सावळी हे गाव औद्योगिक वसाहत कुपवाड परिसराच्या नजीक असून सावळी ग्रा.प. कार्यक्षेत्रात विविध कोल्ड स्टोरेज,फाउंड्री, कारखाने तसेच औषध निर्माण करणारे कारखाने आहेत.
या सौरऊर्जेवरती चालणाऱ्या पाण्याच्या टाकीची संकल्पना पूर्णत्वाकडे नेण्यासाठी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सन्मती गणे उपसरपंच निर्मला कुपवाडे, कुबेर गणे, दीपक कारंडे, बजरंग माळी, अबू समलेवाले, रोहित तांबडे, पूजा बंडगर, छाया मोरे, उषा शिंदे, फिरोजा मुलाणी, प्रदीप कोरे, प्रदीप बंडगर, कल्पना शिंदे, धर्मप्रिया कांबळे, राजू चौगुले, किरण डोंगरे, अजय कांबळे पाणी टाकी उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.
तसेच ग्रामपंचायत अधिकारी
श्री बाबासाहेब खाडे यांचे विशेष सहकार्य लाभले.