

सांगली जिल्ह्यातील घरफोडीचे चार गुन्हे उघड : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई : रेकॉर्डवरील तीन आरोपी जेरबंद : साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त :
वृत्तवेग न्यूज:
घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस आले असून रेकॉर्डवरील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या कडून सोने, चांदिचे दागिने, रोख रक्कम असा साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली आहे. आरोपी सुदर्शन सुनिल यादव, मुनीब मुश्ताक भाटकर, दिपक गंगाप्पा आवळे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तपासामध्ये आरोपींनी सांगली जिल्ह्यात चार घरफोडी केल्याची कबुली दिली आहे.
पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शाना खाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक, संदिप शिंदे, सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल ऐदाळे, बसवराज शिरगुप्पी, गुंडोपंत दोरकर, पोलीस नाईक अनंत कुडाळकर, पोलीस शिपाई अभिजित माळकर, संकेत कानडे, ऋषिकेश सदामते, अजय बेंदरे, रोहन घस्ते कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर यांनी तपास पथकात सहभाग घेतला