


लोकशाहीतील चौथा स्तंभ असणारी माध्यम ही अबाधित राखण्यासाठी पत्रकारांच्यात एकी असणं गरजेचं :- माजी पालकमंत्री डॉ. सुरेश भाऊ खाडे यांनी व्यक्त केला.
लोकशाहीतील चौथा स्तंभ असणारी माध्यम ही अबाधित राखण्यासाठी पत्रकारांच्यात एकी असणं गरजेचं आहे, पत्रकारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासन हे नेहमी पत्रकारांच्या पाठीशी राहील, असा विश्वास माजी पालकमंत्री डॉ. सुरेश भाऊ खाडे यांनी व्यक्त केला.
मिरज शहर पत्रकार संघाच्या वतीने मिरजेत आयोजित करण्यात आलेल्या मराठी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात डॉ. सुरेश भाऊ खाडे बोलत होते. यावेळी आमदार इद्रिस नायकवडी, जनसुराज युवाशक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, मिरजेचे पोलीस उपाधीक्षक प्रणील गिल्डा, महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता, मिरजेच्या तहसीलदार सौ अपर्णा धुमाळ - मोरे,
मिरज शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण रासकर, मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजित सिद्, महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, मिरज शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे हे उपस्थित होते.
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जालिंदर हुलवान यांनी केले. तर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत मिरज शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद सातपुते यांनी केलं. प्रास्ताविक रवींद्र कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ पत्रकार के के जाधव यांनी मांडले. पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय अण्णा कोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
चौथा स्तंभ हा एक जुटीने आणि एका ताकतीने कायम असावा, असं सांगून डॉ. सुरेश भाऊ खाडे पुढे म्हणाले, शासन आणि प्रशासन यांच्या कामातील उणीवा समोर आणण्याचं महत्त्वाचं काम माध्यम करत असतातच. पण त्याच बरोबर माध्यमाने विकासात्मक आणि सकारात्मक बातम्यांना सुद्धा ठळकपणे प्रसिद्धी देणे गरजेचे आहे, अस ही डॉ. सुरेश भाऊ खाडे यांनी सांगितले.
बातमीतील आशय आणि बातमीचे सादरीकरण यावर ती बातमी लोकांच्या पुढे प्रभावीपणे पोहोचवली जात असते. दैनिक किंवा वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी ह्या दोन्ही माध्यमातील पत्रकार हे निर्भीडपणे पत्रकारितेचे महत्त्वाचे काम प्रभावीपणे करत असतात. आपण सर्व माध्यमातील आणि संघटनातील पत्रकार आणि एकत्रित येऊन पत्रकार दिन साजरा करीत आहात ही खरोखर चांगली गोष्ट आहे, असेही आमदार इद्रिस नायकवडी यांनी यावेळी सांगितलं.
मिरज शहरांमध्ये पत्रकारांच भवन उभारणीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, शासन आणि प्रशासन पातळीवर पत्रकारांच्या सोबत बैठक आयोजित केल्या जातील, त्याचबरोबर पत्रकारांच्या प्रश्न सोडवण्यासाठी, नेहमी आपण पत्रकारांच्या सोबत राहू असा विश्वास जनसुराज युवाशक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी व्यक्त केला.
प्रत्येक वेळी विरोधाला विरोधी करून चालत नाही, आणि प्रत्येक गोष्टीला समर्थन देऊन सुद्धा चालत नाही, म्हणून लोकशाहीमध्ये माध्यमांच्या कडून वस्तूनिष्ठ टीकात्मक समीक्षा होने देखील गरजेचं असतं, असं सांगून सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्त शुभम गुप्ता पुढे म्हणाले, मिरजेतील पत्रकारांच्यासाठी पत्रकार भवनच्या जागेसाठी महापालिकेकडून सर्वतो परि सहकार्य केले जाईल, असा विश्वास ही आयुक्त शुभम गुप्ता यांनी व्यक्त केला.
वस्तुनिष्ठ माहिती पोहोचवण्या बरोबरच लोकांची मत बनवण्यामध्ये माध्यम ही फार महत्त्वाची भूमिका बजवत असतात, असं सांगून मिरजेचे पोलीस उपाधीक्षक प्रणील गिल्डा पुढे म्हणाले, माध्यमांची विश्वासाहर्ता ही फार महत्त्वाची आहे. त्याचबरोबर लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी माध्यमाने निर्भीडपणे आपली पत्रकारिता करणे गरजेचे आहे. माध्यमात होत असल्या वेगवान बदलांच्या पार्श्वभूमीवर सर्वच माध्यमांनी जलद बातमी देत असताना, ती माहिती तपासून आणि वस्तूनिष्ठ माहितीच्या आधारेच द्यावी, असं मतही पोलीस उपाधीक्षक प्रणील गिल्डा यांनी व्यक्त केलं.
मिरजेतील पत्रकार भवन साठी प्रशासनातील अधिकारी म्हणून मी ग्वाही देते की, पत्रकारांच्या प्रस्ताव दिल्यानंतर लवकरात लवकर महसूल विभागाकडून आवश्यकता सर्व कागदोपत्री पूर्तता पूर्ण करून दिल्या जातील, अशी ग्वाही मिरजेच्या तहसीलदार अपर्णा धुमाळ मोरे यांनी दिली.
यावेळी मिरज शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद सातपुते, के के जाधव, दिगंबर शिंदे, जालिंदर हूलवान, रवींद्र कांबळे गणेश आवळे, जगदीश धुळूबुळू,शंकर भोसले, उदय रावळ, प्रशांत नाईक, विनायक क्षीरसागर, राहुल मोरे, राजेंद्र कांबळे, युवराज सोनवणे, सुशांत घोरपडे, इम्तियाज शेख जमीर, जमीर रहिमतपुरे, आदी माने, तोहीद मुल्ला, कौसेन मुल्ला, सागर घाडगे, गीतांजली पाटील, प्रज्ञा म्हेत्रे, मयुरी देशपांडे, विनायक तांबोळकर, सूर्यकांत कुकडे, धनंजय पाठक, राकेश कोळेकर, संजय माने, विक्रांत लोंढे, विशाल जाधव, मल्हारी, ओमासे, सुशांत नलावडे, आबिद शेख, बाळासाहेब गुरव, आयुबखान जमादार, सलीम मुल्ला, अनिल कांबळे, राहुल कांबळे, सुनील पाटील, विनायक सूर्यवंशी, सलीम अतार, धनंजय हलकर, शहाबाज मुतवल्ली, मुस्तफा बुजरुक, चंद्रकांत जाधव, संदेश लगाडे, गणेश वायदंडे, मनोज कांबळे,चेतन वाघमारे,तेजस ढेरे, दीपक सकटे, विनायक बने, मनोहर कुरणे, यश ढवळे, आदिल मकानदार, नजीर शेख, हेमंत काळे, दीपक कुंभार, नौशाद मुल्ला, अल्ताफ खतीब, जे वाय पाटील, दीपक ढवळे,कैस सय्यद, राजू पाटील, महेश भिसे, संग्राम निंबाळकर, चंद्रकांत गायकवाड, आप्पा पाटणकर, ता स कांबळे, राजेंद्र पाटील, इम्रान मुल्ला, सलीम मुल्ला, नंदकुमार येवारे, पैगंबर मुलानी, मोहम्मद अत्तार, बंडू चौगुले आणि समीर फौजदार आदी पत्रकार उपस्थित होते.