माजी आमदार प्रदीप नाईक यांचे दुःखद निधन.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वतीने शोक संदेश

Spread the love

माजी आमदार प्रदीप नाईक यांचे दुःखद निधन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वतीने शोक संदेश

मुंबई, दि. 01 दैनिक वृत्तवेग डिजिटल माध्यम

मुख्य-संपादक गणेश वायदंडे

नवीन वर्षाचा पहिलाच दिवस राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्ष आणि नाईक कुटुंबासाठी दुःखाचा ठरला आहे. कारण शरद पवार गटाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचं निधन झालं. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने प्रदीप नाईक यांची प्राणज्योत मालवली. आज, बुधवार एक जानेवारी २०२५ रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास प्रदीप नाईक यांचे निधन झाले. हैदराबाद येथे ही दुःखद घटना घडली आहे.

“किनवटचे माजी माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या निधनाने धडाडीचा लोकप्रतिनिधी, कर्तव्यनिष्ठ लोकसेवक हरपला आहे. त्यांच्या निधनाने किनवटच्या सामाजिक जीवनाशी घट्ट नाळ जुळलेले व्यक्तिमत्त्व हरपले आहे. किनवट विधानसभा मतदार संघाच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. दिवंगत प्रदीप नाईक यांच्या कुटुंबियांच्या, सहकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी असून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.

प्रदीप नाईक हे शरद पवार यांचे विश्वासू मानले जात होते. नांदेड जिल्ह्यातील किनवट विधानसभा मतदारसंघातून त्यांनी यंदा राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र भाजप उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला होता. पराभवाचा त्यांना चांगलाच धक्का बसला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *